CSK vs KKR: मला आनंद आहे की...; पराभवानंतरही कर्णधार श्रेयस अय्यर का आहे खूश?

CSK vs KKR: यंदाच्या सिझनमध्ये कोलकात्याने पहिला सामना गमावला. या सामन्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने पराभवाचं कारण स्पष्ट केलंय. 

सुरभि जगदीश | Updated: Apr 9, 2024, 09:21 AM IST
CSK vs KKR: मला आनंद आहे की...; पराभवानंतरही कर्णधार श्रेयस अय्यर का आहे खूश? title=

CSK vs KKR: आयपीएलमध्ये सोमवारी चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने कोलकात्याचा विजय रख रोखत यंदाच्या सिझनमधील तिसरा विजय नोंदवला आहे. विजयाची हॅट्ट्रिक करणाऱ्या केकेआरला घरच्या मैदानावर एकतर्फी झालेल्या सामन्यात सीएसकेकडून दारुण पराभव पत्करावा लागला. आयपीएल 2024 मध्ये टीमला 7 विकेट्स राखून पहिला पराभव स्वीकारावा लागला. दरम्यान या पराभवानंतर KKR चा कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणाला ते पाहूया. 

यंदाच्या सिझनमध्ये कोलकात्याने पहिला सामना गमावला. या सामन्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने पराभवाचं कारण स्पष्ट केलंय. 

पॉवर प्लेमध्ये झाली चूक

सामन्यानंतर श्रेयस अय्यर म्हणाला, 'पॉवरप्लेमध्ये आम्हाला चांगली सुरुवात झाली, पण काही काळाने आम्ही विकेट्स सतत गमावल्या. पॉवर प्लेनंतर आम्हाला परिस्थिती सुधारता आली नाही. याशिवाय रन करणं सोपं नव्हतं. चेन्नईच्या टीमला परिस्थितीची चांगली माहीती होती. त्यांनी त्यांच्या योजनेनुसार गोलंदाजी केली. आम्ही डाव सावरण्याचा प्रयत्न करत होतो, पण ते आमच्या प्लॅनच्या हिशोबानुसार झालं नाही. 

श्रेयस अय्यरने पुढे सांगितले की पॉवर प्लेनंतर त्याचा प्लॅन काय होता? प्लॅनविषयी सांगताना अय्यर म्हणाला, 'पॉवरप्लेनंतर विकेट बदलली आम्हाला वाटलं की, 160-170 चांगली रन्स योग्य होतील, मात्र आम्ही गती गमावली. आम्हाला ड्रॉईंग बोर्डवर परत जावं लागेल आणि त्यातून शिकले पाहिजे. लीगच्या सुरुवातीला हे घडलं याचा मला आनंद आहे. 

चेन्नईचा केकेआरवर विजय

चेन्नई सुपर किंग्सने केकेआरविरूद्ध 7 विकेट्सने विजय मिळवला. सीएसकेकडून ऋतुराज गायकवाडने 67 रन्सची कॅप्टन्स खेळी खेळून सीएसकेला सोपा विजय मिळवून दिला आहे. फलंदाजीत चेन्नईकडून मिचेलने 25, दुबेने 28 धावा करत केकेआरला एकतर्फी पराभूत केलं आहे. गोलंदाजीत केकेआरकडून निराशाजनक प्रदर्शन झाले, वैभव अरोरा याने 2 तर, सुनील नरेनने 1 विकेट घेतली आहे.

20 ओव्हरच्या समाप्तीनंतर चेन्नईसमोर जिंकण्यासाठी 138 रन्सचं आव्हान आहे. केकेआरकडून साधारण फलंदाजीचे प्रदर्शन बघायला मिळालं. नरेनने 27, रघुवंशीने 24, तर श्रेयस अय्यरच्या 34 धावांच्या मदतीने कोलकाता 137 धावांपर्यंत पोहोचली होती. चेन्नईच्या गोलंदाजांनी उत्तम प्रदर्शन करत केकेआरच्या घातक फलंदाजीला मुठीत ठेवलं होतं.