आयपीएल २०१९ | हैदराबादचा टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय

या मॅचसाठी टीममध्ये २ बदल करण्यात आले आहेत.

Updated: Apr 6, 2019, 08:13 PM IST
आयपीएल २०१९ | हैदराबादचा टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय      title=

हैदराबाद : हैदराबाद विरुद्ध मुंबई या उभय टीममध्ये आज लढत होत आहे. ही मॅच हैदराबाद टीमच्या होमग्राऊंडवर म्हणजेच राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर  खेळण्यात येणार आहे. त्यामुळे हैदराबादला आपल्या स्थानिक क्रिकेट चाहत्यांचा पाठिंबा असणार आहे. हैदराबादने टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईने गेल्या मॅचमध्ये सलगपणे ३ मॅच जिंकणाऱ्या चेन्नईचा ३७ रनने पराभव केला होता. त्यामुळे मुंबईचा आत्मविश्वास दुणावला आहे. मुंबई अंकतालिकेत ४ गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. तर हैदराबादने खेळलेल्या पहिल्या मॅचचा अपवाद वगळता पुढील ३ मॅचमध्ये सलगपणे विजय मिळवला आहे. त्यामुळे मुंबईपुढे हैदराबाद टीमला रोखण्याचे तगडे आव्हान आहे. या मॅचसाठी मुंबईच्या टीममध्ये २ बदल करण्यात आले आहेत. युवराज सिंगऐवजी टीममध्ये इशान किशनला संधी देण्यात आली आहे. गतवर्षाच्या आयपीएल पर्वात किशनने उत्तम कामगिरी केली होती. तसेच मलिंगा श्रीलंकेत स्थानिक क्रिकेट खेळण्यासाठी गेल्याने त्याच्या जागी अल्झारी जोसेफला स्थान देण्यात आले आहे.

हैदराबादचे आव्हान

मुंबईला जर या मॅचमध्ये विजय मिळवायचा असेल तर जॉन बेयरेस्टोला मोठी खेळी करण्यापासून रोखावे लागेल. दिल्ली विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये बेयरेस्टोने ४८ रनची धडाकेबाज खेळी केली होती. तसेच डेव्हिड वॉर्नरला रोखण्याचे आव्हान देखील असणार आहे. वॉर्नर देखील गेल्या काही मॅचपासून चांगली कामगिरी करताना दिसत आहे. मोहम्मद नबी, राशिद खान आणि फास्टर भुवनेश्वर कुमार सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. त्यामुळे मुंबईच्या बॅट्समनना बॅटिंगदरम्यान सावधपणे खेळावे लागणार आहे.

मुंबईकडे रोहित शर्मा, युवराज सिंह, सुर्यकुमार यादव, क्विंटन डिकॉक,  किरण पोलार्ड आणि पांड्या बंधू सारखे पट्टीचे बॅट्समन आहेत. तर बॉलींगची जबाबदारी ही जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या या प्रमुख बॉलर्सच्या खांद्यावर असणार आहे. परंतू टीममध्ये मलिंगा नसल्याने त्याची कमी भासणार आहे.