Indian Cricket Team Plyaing 11 against South Africa: टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असून आज दुसरा टी-20 सामना खेळवला जाणार आहे. पहिला सामना पावसाने रद्द झाल्याने दुसऱ्या सामन्याची चाहत्यांना फार उत्सुकता आहे. दुसरा सामना पोर्ट एलिझाबेथमध्ये खेळवला जाणार असून टीम इंडियाची प्लेईंग 11 कशी असणार आहे हे पाहूयात.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 सिरीजमध्ये ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जयस्वाल यांनी ओपनिंग केली होती. मात्र आला गिल टीममध्ये आल्यामुळे गिल खेळणार हे निश्चित आहे. त्यामुळे त्याच्यासोबत ओपनिंग कोण करणार हा मोठा प्रश्न आहे. यावेळी यशस्वी जयस्वाल प्रबळ दावेदार मानला जातोय. यशस्वी जयस्वालच्या डाव्या हाताचा फलंदाज आहे. अशा स्थितीत टीम इंडिया लेफ्टी-राईटी कॉम्बिनेशनसोबत गेल्यास जयस्वालला संधी मिळू शकते.
T20 सिरीजमध्ये विकेटकीपर कोण असणार हा मोठा प्रश्न आहे. याबाबत कर्णधार सूर्यकुमार यादवला मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे. इशान किशनने नुकत्याच पार पडलेल्या T20 च्या 3 सामन्यात 110 रन्स केले होते. तर एकूण T20 मध्ये त्याने 32 सामन्यांमध्ये 25.67 च्या सरासरीने 796 रन्स केले. नुकत्याच झालेल्या रायपूर आणि बेंगळुरूच्या सामन्यांमध्ये जितेश शर्मालाही संघाने संधी देण्यात आली होती. या सामन्यांमध्ये त्याने 35 आणि 24 रन्स केले होते.
ओपनर्सनंतर श्रेयस अय्यर तिसऱ्या क्रमांकावर खेळायला उतरू शकतो. त्यानंतर सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग, रवींद्र जडेजा असतील. यावेळी इशान किशनला टीममध्ये संधी मिळण्याची शक्यता कमी दिसतेय.
टीम इंडियाची गोलंदाजी कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार यांच्या हाती असणार आहे. याशिवाय स्पिनर म्हणून रविंद्र जडेजा एक पर्याय आहे. रवी बिश्नोई आता नवा नंबर 1 टी-20 गोलंदाज असल्याने त्याला कुलदीप आणि जडेजा यांच्या उपस्थितीत खेळणं कठीण आहे.
टीम इंडिया
यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल/ऋतुराज गायकवाड, जितेश शर्मा (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव/रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार.
दक्षिण आफ्रिका
रीझा हेंड्रिक्स, मॅथ्यू ब्रेट्झके, एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स/हेन्रिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, मार्को जॅन्सन/अँडिले फेहलुकवायो, केशव महाराज, गेराल्ड कोएत्झी, नांद्रे शाब्रासी आणि तबरेज शम्सी.