England test squad vs India: दक्षिण आफ्रिकेच्या सिरीजनंतर पुढच्या महिन्यात म्हणजेच नवीन वर्षात टीम इंडियाचा सामना इंग्लंडशी होणार आहे. यावेळी टीम इंडियाला इंग्लंडविरूद्ध 5 सामन्यांची टेस्ट सिरीज खेळायची आहे. या सिरीजसाठी टीमची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी इंग्लंडच्या टीममध्ये 19 वर्षाच्या खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. यानुसार पाच टेस्ट सामन्यांच्या सिरीजमध्ये 16 सदस्यीय खेळाडूंची टीम जाहीर करण्यात आली आहे.
या 16 सदस्यांच्या टीममध्ये 4 स्पिनर्सची निवड करण्यात आली आहे. यामध्ये टॉम हार्टली आणि बशीर या स्पिनर्स खेळाडूंचाही समावेश आहे. या दोन्ही खेळाडूंनी टीमसाठी डेब्यू केलेलं नाही. ऑफस्पिनर हार्टले आणि बशीर हे दोघेही इंग्लंड लायन्स टीमचा भाग होते.
इंग्लंडने 19 वर्षीय खेळाडूचा टीममध्ये समावेश केला आहे. रेहान अहमद असं या खेळाडूचं नाव आहे. रेहानने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या टेस्ट सामन्यात डावात पाच विकेट घेतल्या होत्या. त्याचवेळी, सॉमरसेटकडून खेळणाऱ्या बशीरने या वर्षी जूनमध्ये डेब्यू केल्यानंतर 6 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 10 विकेट्स घेतल्या आहेत. फिरकीपटू जॅक लीचलाही टीममध्ये स्थान मिळालंय.
टीम इंडियाविरूद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये गस एटकिंसनचा देखील इंग्लंडच्या टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. गेल्या काउंटी चॅम्पियनशिप सिझनमध्ये त्याने 5 सामन्यांत 20.20 च्या सरासरीने 20 विकेट्स घेत आपल्या टीमला सलग दुसरं विजेतेपद मिळवून दिलं आहे. गस ऍटकिन्सनचा प्रथमच इंग्लंडच्या टेस्ट टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. शोएब बशीर आणि टॉम हार्टलीनंतर इंग्लंडच्या टेस्ट टीममध्ये सामील होणारा तो तिसरा अनकॅप्ड खेळाडू असणार आहे.
बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जेम्स अँडरसन, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), शोएब बशीर, हॅरी ब्रूक, जॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फॉक्स (यष्टीरक्षक), टॉम हार्टले, जॅक लीच, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, जो रूट आणि मार्क वुड.