How Rohit Sharma Become MI Captain: टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून धोनीची ओळख आहे. मात्र, आयपीएलमध्ये रोहित शर्माने बाजी मारलीये. रोहित शर्मा (Rohit Sharma) आयपीएलमधील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरलाय. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने (MI Captain) एकूण 5 आयपीएल जेतेपदे जिंकली आहेत. त्यानंतर आत्तादेखील तो मुंबईचं नेतृत्व करतो. मात्र, 10 वर्षापूर्वी असं काय झालं? ज्यामुळे रोहितला मुंबईला कॅप्टन करण्यात आलं, याविषयी तुम्हाला माहिती आहे का? (how rohit sharma become mumbai indians captain explain by Anil Kumble before ipl 2023 latest sports news)
भारताचा माजी खेळाडू आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे (Anil Kumble) यांनी मोठा खुलासा केला आहे. रोहित शर्माकडे मुंबई इंडियन्स (MI) फ्रँचायझीची जबाबदारी कशी काय आली? यावर अनिल कुंबळे यांनी मोठं वक्तव्य केलंय.
आयपीएल 2013 मध्ये आम्ही 4-5 सामने गमावले होते. त्यावेळी कॅप्टन बदलण्याची गरज होती. मी आणि जॉन्टी राईटने रोहित शर्माला विचारलं होतं की तुला मुंबई इंडियन्सचा कर्णधार (Captain of Mumbai Indians) बनायचंय का? यावर उत्तर देताना रोहितने सकारात्मक उत्तर दिलं होतं. मी संघाची जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहे, असं रोहित म्हणाला होता, असं अनिल कुंबळे सांगतात.
रोहित कॅप्टन झाल्यावर आम्ही मागे वळून पाहिलंच नाही. कर्णधार म्हणून रोहित शानदार कामगिरी करतोय आणि त्यानं आतापर्यंत सर्वाधिक आयपीएल कप (IPL Cup) जिंकले आहेत. त्यामुळे आम्हाला त्याच्यावर विश्वास आहे, असं वक्तव्य अनिल कुंबळे यांनी केलंय.
Rohit Sharma : मेव्हण्याच्या लग्नात हिटमॅनने पत्नी रितीकासोबत लगावले ठुमके; तुम्ही पाहिलात का Video?
दरम्यान, 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टार कॅप्टन रिकी पाँटिंग (Ricky Ponting) कॅप्टन्सी करत होता. मात्र, भारतीय मैदानात त्याला जम बसवता आला नाही. त्याच्या कर्णधारपदाखाली टीम चांगली कामगिरी करत नव्हती. त्यामुळे संघाचा कर्णधार बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 2011 पासून मुंबईकडून खेळणाऱ्या रोहितने आत्तापर्यंत 227 सामने खेळले आहेत.
IPL Promo featuring Rohit Sharma. pic.twitter.com/dmIWnnJjtQ
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 14, 2023
बुमराहच्या रूपाने मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) धक्का बसला आहेच, तर आता अजून एक खेळाडू आयपीएलमधून (IPL 2023) बाहेर होण्याच्या मार्गावर आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमचा गोलंदाज झे रिचर्डसन (Jhye Richardson) यंदाच्या आयपीएलला मुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता रोहित शर्माचं टेन्शन वाढल्याचं पहायला मिळतंय.