फायनलपूर्वीच बांग्लादेशनं असा जिंकलाय 'वर्ल्डकप'...

... आणि प्रेक्षकांची मनंही!  

Updated: Sep 28, 2018, 09:33 AM IST
फायनलपूर्वीच बांग्लादेशनं असा जिंकलाय 'वर्ल्डकप'... title=

दुबई : आशिया कप 2018 मध्ये फायनल मॅच भारत आणि बांग्लादेश या दोन प्रबळ दावेदारांमध्ये रंगणार आहे. परंतु, बांग्लादेशी कॅप्टन मशरफी मूर्तजा यानं आपण फायनल अगोदर वर्ल्डकप जिंकल्याचं जाहीर वक्तव्य केलंय. 'भारत ही एक सर्वश्रेष्ठ टीम आहे, असं म्हणायला मी कचरणार नाही... पण आम्ही आशिया कप तेव्हाच जिंकलाय जेव्हा तमीम इकबालनं टूर्नामेंट सुरुवातीच्या मॅचमध्ये एका हातानं बॅटिंग केली होती', असं मूर्तजानं म्हटलंय. 

बांग्लादेशचा सलामी बॅटसमन तमीम अशा काही खेळाडूंपैंकी एक आहे ज्याची कमरतरता भारत विरुद्ध बांग्लादेश फायनल मॅचमध्ये प्रेक्षकांना जाणवणार आहे. 

तमीमशिवाय बांग्लादेशचा ऑलराऊंडर शकिबुल हसन हा देखील या मॅचमध्ये खेळणार नाही. मात्र, मूर्तजा आणि मुश्फिकुर रहीम दुखापतग्रस्त असतानाही मैदानावर खेळताना दिसणार आहेत. 

 

Asia Cup 2018: Bangladesh beat Sri Lanka by 137 runs

 

'प्रामाणिकपणे सांगायचं तर ज्यावेळी तमीम श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्ये मुश्फिकरच्या मदतीसाठी शेवटचा खेळाडू म्हणून मैदानात उतरला तेव्हाच आम्ही आशिया कप जिंकला होता', असं म्हणताना मूर्तजानं भावूक होत म्हटलं. 

'आमचा आतापर्यंतचा प्रवास कठिण राहिला कारण आम्हाला पहिल्या मॅचपासूनच दुखापतींमुळे खेळाडू गमावावे लागले होते... मुश्फिकुरही खेळू शकेल की नाही याबाबत शंका होती... परंतु, तो खेळला...' असंदेखील त्यानं म्हटलंय.त 

2016 मध्ये बांग्लादेशला टूर्नामेंटच्या फायनलमध्ये भारताकडून पराभव स्वीकारावा लागला होता. तर चार वर्षांपूर्वी याच टूर्नामेंटमध्ये शेवटच्या मॅचमध्ये बांग्लादेशला पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला होता.