युवराज सिंह होणार लवकरच बाबा?

लग्नसराईत ही गोड बातमी 

युवराज सिंह होणार लवकरच बाबा? title=

मुंबई : ईशा अंबानी आणि आनंद पीरामल यांच्या लग्नात अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते. या कार्यक्रमात क्रिकेटर युवराज सिंह पत्नी हेजल कीचसोबत सहभागी झाला होती. मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघं लवकरच आई-बाबा होणार आहे. 

ईशा अंबानीच्या लग्नात अनेकवेळा हेजल कीच आपलं पोट लपवताना दिसली. याच गोष्टीवरून असा अंदाज लावण्यात येत आहे की हेजल गरोदर आहे. युवराज आणि हेजलचे चाहते ही गोष्ट ऐकताच खूप आनंदी झाले आहेत. 

युवराज आणि हेजल ही आनंदाची गोष्ट लवकरच अधिकृतरित्या सगळ्यांना सांगतिल. हेजल आणि युवराज यांनी 30 नोव्हेंबर 2016 रोजी लग्न केलं आहे. युवराज आणि हेजल यांची ओळख एका पार्टीत झाली होती. नुकतीच या दोघांनी आपल्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा केला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Happy Diwali to one and all! Love, the Keech-Singhs

A post shared by Hazel Keech Singh (@hazelkeechofficial) on

दुसऱ्या वेडिंग अॅनिवर्सरीला हेजल कीचने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. या फोटोत युवराज बॅटमॅनच्या रुपात दिसत आहे. तर हेजल वंडरवुमनच्या रुपात दिसत आहे. हेजलने हा फोटो शेअर करताना लिहिलं की, माझा लाइफ पार्टनर आणि माझा क्राइम पार्टनर. या दोन वर्षांत माझ्या चांगल्या, वाईट काळात मला खूप सपोर्ट केला. मला आम्हा दोघांवर गर्व आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, ईशाच्या लग्नात सगळीकडे युवराज आणि हेजलच्या लग्नाची चर्चा करतानाच दिसले. लवकरच या दोघांकडून या गोडबातमीची अपेक्षा आहे. 2 दिवसांपूर्वीच युवराजने आपला वाढदिवस साजरा केला आहे. 

युवराज आणि हेजल यांचा विवाह चंदीगडमध्ये अगदी पारंपरिक पद्धतीने झाला. या लग्नाला अगदी जवळचे नातेवाईक आणि मित्र परिवार सहभागी होती. लग्नानंतर दोघांनी शानदार रिसेप्शन दिलं. लग्नानंतर दोघं अनुष्का-विराटसोबत गोव्यात पार्टी करताना देखील दिसले.