पर्थ : एडिलेट ओवल मैदानावर यजमान ऑस्ट्रेलियाला धूळ चाळल्यानंतर भारताचा संघ आता दुसरी कसोटीही खिशात टाकण्यास सज्ज झालायं. पर्थ येथे सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन टिम पेनने नाणेफेक जिंकून प्रथम बॅटींगचा निर्णय घेतला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या 4 कसोटी सामन्यातील हा दूसरा सामना आहे. टीम इंडियाकडून पहिली ओव्हर ईशांत शर्माने टाकली असून यामध्ये कोणताही रन ऑस्ट्रेलियन फलंदाजांना मिळाला नाही.
टीम इंडियामध्ये दोन बदल पाहायला मिळत आहेत. रोहित शर्माच्या जागी हनुमा विहारीला तर रवि चंद्रन आश्विनच्या जागी उमेश यादवला संघात स्थान देण्यात आले आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या संघात कोणतेही बदल नाहीत.
या सिरीजमधील पहिला सामना जिंकल्यानंतर भारताच्या आत्मविश्वासात वाढ झाली आहे. पर्थचं वेगवान मैदान आपली मदत करेल अशी ऑस्ट्रेलियाला आशा आहे. गेली पाच दशक हे मैदान फास्ट बॉलर्ससाठी मदतीचं ठरल आहे. त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलियाचा संघ पुर्णपणे आपल्या वेगवान बॉलर्सच्या भरवशावर मैदानात उतरलाय.
विराट कोहली (कॅप्टन), मुरली विजय, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव.
टिम पेन (कॅप्टन आणि विकेटकीपर), मार्कस हॅरिस, एरोन फिंच, उस्मान खवाजा, ट्रेविस हेड, शॉन मार्श, पीटर हेड्सकोम्ब, नाथन लॉयन, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, जोश हेजलवुड.