मुंबई : आयपीएलमध्ये बंगळुरूकडून खेळणाऱ्या हर्षल पटेलची कामगिरी सर्वोत्तम आहे. डेथ ओव्हरमध्ये त्याच्या बॉलची जादू वेगळीच आहे. हर्षल पटेलनं आपल्या बॉलिंगचं कौशल्य आणि या यशामागचं रहस्य उलगडलं आहे.
आयुष्यात असा एक व्यक्ती हवा असतो ज्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो आणि आपल्या चूका सुधारून चांगल्या गोष्टीला प्रोत्साहन देईल. हर्षल पटेलला असाच एक व्यक्ती भेटला. ज्याने त्याचं आयुष्य 360 डिग्री बदलून टाकलं आहे.
ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून जहीर खान आहे. जहीर खानला खेळताना पाहाणं आणि त्यातही विकेट काढताना पाहायला हवं. त्याची कामगिरी पाहून आपण थक्क होतो. त्याच्याकडून ही गोष्ट खूप शिकण्यासाठी आहे. मी त्याला बॉलिंगचा जबरदस्त फॅन आहे. त्यातून मला प्रेरणाही मिळाली असं हर्षल पटेल म्हणाला.
'आरसीबीमध्ये 2012 मध्ये मी जेव्हा सहभागी झालो तेव्हा जहीर खानही या टीमचा भाग होते. माझ्या प्रत्येक बॉलनंतर ते येऊन मला बॉल कसा गेला पाहिजे हे सांगायचे. जिथे चांगलं असेल तिथे प्रेरणा द्यायचे जिथे चुकले तिथे मला मदत करायचे सल्ला द्यायचे.'
पुण्यात जेव्हा मी सामना खेळत होतो तेव्हा मी रॉबिन उथप्पाला स्लोवर बॉल टाकला. तेव्हा त्याने सिक्सर ठोकला. त्यावर मला जहीर खानने स्लोवर बॉल न टाकण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांनी मला सांगिलं की सगळं ठिक चालू आहे.