मेस्सीचा विक्रम मोडून केन ठरला यूरोपचा 'सूपर गोलर'

 2017 मध्ये देश आणि क्लबमध्ये सर्वाधीक गोलची कामगिरी नावावर असलेल्या लियोनल मेस्सीचा विक्रम मोडून केनने हे यश मिळवले.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Dec 27, 2017, 01:46 PM IST
मेस्सीचा विक्रम मोडून केन ठरला यूरोपचा 'सूपर गोलर' title=

नवी दिल्ली : जोरदार कामगिरी करत यूरोपचा सर्वाधीक गोल करणार फुटबॉलपटू ठरण्याचा बहुमान हॅरी केनने पटकावला आहे. 2017 मध्ये देश आणि क्लबमध्ये सर्वाधीक गोलची कामगिरी नावावर असलेल्या लियोनल मेस्सीचा विक्रम मोडून केनने हे यश मिळवले.

22 मिनिटाला मारला पहिला गोल

मेस्सीचा विक्रम मोडीत काढल्यामुळे केन आपसूकच एक स्टार खेळाडू तर ठरला आहेच. पण, 2017 मधला सर्वाधीक गोल करणारा खेळाडू असाही विक्रम त्याच्या नावासमोर जोडला गेला आहे. टॉटेनहम होटस्पूर इथे वेंबलीच्या मैदानावर केनने सॉउथम्टनविरूद्ध दोन गोल मारले आणि विक्रम नोंदवला. केनने 22 व्या मिनिटाला पहिला गोल केला. या वर्षीचा हा त्याचा 37 वा गोल होता. या सोबतच त्याने एलन शियररने पाठिमागच्या प्रीमियर लीगमध्ये केलेल्या विक्रमाच्याही पूढचा टप्पा गाठला. जो त्याने 1995 मध्ये ब्लॅकबर्न रोवर्स विरोधात खेळताना केला होता. केनने याच सामन्यात 39 व्या मिनीटाला आपला दुसरा गोल केला.

मेस्सी मोडणार नाही केनचा विक्रम

दरम्यान,  2017मध्ये केनच्या क्लब आणि देशातील गोल्सची संख्या 55 वर पोहोचली आहे. आता तो बार्सिलोनच्या लियोनल मेस्सीच्याही पुढे गेला असून, तो यूरोपचा सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू ठरला आहे. मेस्सीने यंदा 54 गोलो केले आहेत. महत्त्वाचे असे की, आता मेस्सी थेट 2018मध्येच खेळणार आहे. त्यामुळे मेस्सीला केनचा विक्रम मोडता येणार नाही.