टीम इंडियात कमबॅक करण्यावर काय म्हणाला हार्दिक पांड्या?

गेल्या काही महिन्यांपासून खराब फॉर्ममुळे टीम इंडियातून बाहेर असलेला हार्दिक पांड्या टी 20 वर्ल्ड कपआधी कमबॅक करणार? पाहा काय म्हणाला

Updated: Apr 24, 2022, 03:00 PM IST
टीम इंडियात कमबॅक करण्यावर काय म्हणाला हार्दिक पांड्या? title=

मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सामने चुरशीने होत आहे. सामने प्ले ऑफच्या दृष्टीने अटीतटीचे होत असताना आता एक मोठी बातमी येत आहे. गुजरात टीमचा कर्णधार हार्दिक पांड्याने टीम इंडियात कमबॅक करण्याबाबत मोठं विधान केलं आहे. 

हार्दिक पांड्या गेल्या काही महिन्यांमध्ये एकतर खराब फॉर्म किंवा दुखापत यामुळे त्रस्त होता. त्याला ऑलराऊंडर का म्हणावं असा प्रश्नही काहींनी उपस्थित केला होता. त्यानंतर हार्दिकने ब्रेक घेतला. आयपीएल लीगमधून तो पुन्हा चांगल्या फॉर्ममध्ये खेळत असल्याचं दिसत आहे. हार्दिकने गुजरात टीमची कमानही खूप चांगली सांभाळली.

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात हार्दिक पांड्याकडे सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून पाहिलं जात आहे. आतापर्यंत झालेल्या 7 सामन्यांपैकी 6 सामने त्याने जिंकले तर एक हरला आहे. हार्दिक पांड्या सहव्या क्रमांकावर टीम इंडियामध्ये बॅटिंगसाठी उतरायचा आता तो पुन्हा टीम इंडियात कमबॅक करणार का? याची उत्सुकता आहे. 

काय म्हणाला पांड्या
टीम इंडियात माझं कमबॅक असं होईल मला वाटत नाही. दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते माझ्या हाताता नाही. सध्या मला आयपीएल आणि ट्रॉफीवर लक्ष केंद्रीत करायचं आहे. मी जो सामना खेळतो, माझे लक्ष फक्त त्या सामन्याकडे असतं. 

सध्या मी आयपीएल खेळत असून आयपीएलवर लक्ष केंद्रित करणार आहे. टीम इंडियात कमबॅक करणं माझ्या हातात नाही. माझं खेळणं मला कुठे घेऊन जातं ते पाहायचं आहे. आता गुजरात टीम चांगली कामगिरी करत आहे आणि त्यामुळे मी खूप आनंदी आहे.

 हार्दिक पांड्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीत टॉप-2 मध्ये आला आहे. पंड्याने 6 सामन्यात 73.75 च्या सरासरीने 295 धावा केल्या. केएल राहुलने 7 सामन्यात 44.17 च्या सरासरीने 265 धावा केल्या. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत जोस बटलरचं नाव आघाडीवर आहे. यावेळी पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकात खूप मोठा फरक आहे.