T20 world Cup final : आयसीसी टी-20 क्रिकेट विश्वचषकात (t20 world cup 2022) इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत भारताला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात टीम इंडियाची (team India) गोलंदाजी जितकी खराब होती तितकीच क्षेत्ररक्षणही चांगले होते. इंग्लंड (England) फलंदाजांना रोखण्यात भारतीय फलंदाज पूर्णपणे असमर्थ ठरले असतानाच, त्यांचे क्षेत्ररक्षणही हतबल ठरले. याच सामन्यादरम्यान मोहम्मद शमीने बॉलसोबत असे काही केले, जे पाहून सगळेच थक्क झाले.
दरम्यान 9 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीप शॉट मारला. चेंडू फाइन लेग बाउंड्रीकडे वेगाने गेला. मोहम्मद शमीने (Mohammed Shami) हा चेंडू पकडण्यासाठी धाव घेतली. त्याच्या मदतीला भुवनेश्वरही (Bhubaneswar) आला.
अन् चेंडू भुवीच्या डोक्यावरून गेला
त्यातच शमीने चेंडू (Mohammed Shami) पकडून विकेटकिपरकडे फेकण्याऐवजी चेंडूचा पाठलाग करणाऱ्या भुवीकडे फेकण्याचा प्रयत्न केला. पण शमी त्याच्या फार जवळ आल्याचे त्याच्या लक्षातच आले नाही. चेंडू भुवनेश्वरच्या डोक्यावरून गेला. हा चेंडू पुन्हा हातात येईपर्यंत इंग्लंडच्या सलामीवीरांनी पळून 4 धावा काढल्या होत्या.
वाचा : Team India च्या पराभवानंतर BCCI अॅक्शन मोडमध्ये; 'या' खेळांडूना दाखवणार बाहेरचा रस्ता
पंड्या हतबल, रोहित संतप्त
शमीची ही चूक पाहून हार्दिक पंड्या (Hardik Pandya) त्याच्याकडे शांत चेहऱ्याने पाहत होता. तर रोहित शर्मा (Rohit Sharma) हातांनी इशारा करत शमीच्या चुकीवर संताप व्यक्त करत होता. सामन्यातील हे दृश्य पाहिल्यानंतर प्रत्येकाने आपल्या डोक्याला हात लावला. दुसरीकडे, आयसीसीने (ICC) इन्स्टाग्रामवर या घटनेचा व्हिडिओ शेअर करत त्याला 'हे काय होते...' असे कॅप्शन दिले.
तसेच बटलर व हेल्सच्या वादळी खेळीमुळे भारतीय संघ अक्षरशः हतबल झाला होता. यामुळेच त्यांच्याकडू अशा चुका झाल्या. बटलरने 80, तर हेल्सने 86 धावा काढून इंग्लंडला 10 गड्यांनी एकहाती विजय मिळवून दिला. एलेक्स हेल्सला त्याच्या धडाकेबाज खेळीसाठी प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला.