रोहितसमोर पंड्या म्हणजे अतिसामान्य! कॅप्टन म्हणून दोघांची आकडेवारी पाहून तुम्हीही असंच म्हणाल...

Hardik Pandya : कर्णधार म्हणून हार्दिकने ( Hardik Pandya ) अनेक चुकीचे निर्णय घेतल्याप्रकरणी त्याच्यावर टीकेचा झोड उठवण्यात आली. अशातच आता हार्दिक पंड्याची रोहित शर्मा ( Rohit sharma ) सोबत तुलना केली जातेय. चला एक नजर टाकूया त्यांच्या आकड्यांवर...

सुरभि जगदीश | Updated: Aug 15, 2023, 04:41 PM IST
रोहितसमोर पंड्या म्हणजे अतिसामान्य! कॅप्टन म्हणून दोघांची आकडेवारी पाहून तुम्हीही असंच म्हणाल... title=

Hardik Pandya : नुकतंच वेस्ट इंडिजविरूद्ध टीम इंडियाला ( Team India ) 3-2 असा टी-20 सिरीजमध्ये पराभव स्विकारावा लागला. या सिरीजच्या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्यावर ( Hardik Pandya ) चाहत्यांनी बऱ्याच टीका केल्या. यावेळी कर्णधार म्हणून हार्दिकने ( Hardik Pandya ) अनेक चुकीचे निर्णय घेतल्याप्रकरणी त्याच्यावर टीकेचा झोड उठवण्यात आली. अशातच आता हार्दिक पंड्याची रोहित शर्मा ( Rohit sharma ) सोबत तुलना केली जातेय. चला एक नजर टाकूया त्यांच्या आकड्यांवर...

हार्दिक पंड्याची काही विचित्र विधानं

हार्दिक पांड्याने यापूर्वी अनेकं विधान केली, ज्यामुळे वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. हार्दिकने काही दिवसांपूर्वी असं म्हटलं होतं की, 2 टीम इंडिया तयार केल्या जाऊ शकतात. तसंच टीम कोणत्याही टीमविरुद्ध जिंकू शकते. यानंतर गेल्यावर्षी न्यूझीलंड दौऱ्यावर खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पाठिंबा देत त्यांना अजून संधी दिली पाहिजे असंही हार्दिकने म्हटलं होतं.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात कर्णधार असताना आणि रोहित आणि विराटला वगळण्याच्या प्रश्नावर हार्दिक म्हणाला होता की, काही प्रश्नांची उत्तरं आम्हाला शोधायची आहेत. मुख्य म्हणजे, त्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला होता आणि हार्दिक पंड्याला पुन्हा ट्रोल करण्यात आलं होतं. यानंतर वेस्ट  इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पराभवानंतर हार्दिकच्या म्हणण्यानुसार, कधीकधी हरणं चांगलं असतं. या विधानानंतरही त्यांच्यावर टीका झाली.

कर्णधार म्हणून कसा आहे हार्दिकचा रेकॉर्ड?

2022 मध्ये टीम इंडियाला टी-20 वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. यानंतर टी-20 च्या टीम इंडियाची जबाबदारी रोहित शर्मावर ( Rohit sharma ) सोपवण्यात आली. हार्दिकने कर्णधार म्हणून 15 टी-20 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 10 सामन्यांमध्ये टीम इंडियाला विजय मिळवण्यात यश आलं आहे. याचसोबत त्याने 3 वनडे सामन्यांमध्ये टीमचं नेतृत्व केलं असून 2 सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला आहे. 

रोहित शर्माचा कर्णधार म्हणून रेकॉर्ड काय सांगतो?

२०२१ च्या वर्ल्डकपनंतर टीम इंडियाच्या कर्णधारपदी रोहित शर्मा ( Rohit sharma ) ची नियुक्ती करण्यात आली. रोहित शर्माच्या हाती नेतृत्वाची धुरा दिल्यानंतर त्याला मोठी सिरीज जिंकणं शक्य झालं नाही, मात्र कर्णधार म्हणून त्याचा रेकॉर्ड काही वाईट नाही. रोहित शर्माने आतापर्यंत 9 टेस्ट सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केलंय ज्यामध्ये 5 जिंकलेत तर 2 अनिर्णित राहिलेत.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 27 वनडे सामन्यांमध्ये 20 सामने जिंकलेत तर 7 सामन्यांमध्ये पराभव स्विकारावा लागला आहे. दुसरीकडे 51 टी-20 सामन्यांमध्ये 39 जिंकलेत आणि 12 पराभूत झालेत. रोहित शर्मा कर्णधार म्हणून विजयाची टक्केवारी टेस्ट म्हणजे 71.42, वनडेत 74.07 आणि टी-20 मध्ये 76.47 आहे. दरम्यान या आकड्यांसमोर हार्दिक पंड्याची कर्णधार म्हणून आकडेवारी काहीच नाहीये.