हरभजन सिंगने सोशल मीडियावर का मागितली माफी? नेमकं काय प्रकरण

हरभजन सिंहने सोशल मीडियावर केलेली पोस्ट चांगलीच महागात पडली. वाचा नेमकं काय झालं.

Updated: Jun 8, 2021, 09:43 AM IST
हरभजन सिंगने सोशल मीडियावर का मागितली माफी? नेमकं काय प्रकरण title=
मुंबई: टीम इंडियाचा ऑफ स्पिनर हरभजन सिंगला सोशल मीडियावर पोस्ट करणं महागात पडलं आहे. त्याला सोशल मीडियावर केलेल्या पोस्टसाठी माफी देखील मागावी लागली आहे. या पोस्टनंतर भज्जीवर खूप टीका होत आहे. तर बॉलर हरप्रीतने मात्र या पोस्टचं समर्थन केलं आहे. नेमका हा वाद काय आहे आणि भज्जीला का माफी मागावी लागली काय आहे प्रकरण जाणून घेऊया. 
भारतीय ऑफस्पिनर हरभजन सिंगने आपली इंस्टाग्राम स्टोरिजमध्ये एक फोटो शेअर केला होता. 1984मध्ये झालेल्या ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये खलिस्तानी दहशतवादी जरनॅल सिंह भिंडरावालेला शहीद असं म्हणण्याचा प्रयत्न करणारी ही पोस्ट भज्जीने शेअर केली होती. त्यानंतर हरभजनवर टीका झाली. हरभजनने आपल्या या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. 
भज्जीने माफी मागितल्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त असे एक खेळाडू आहे जरनॅल सिंह भिंडरावालेच्या कृतीला उघडपणे पाठिंबा देत त्याचं समर्थन केलं.त्यामुळे पुन्हा एकदा हा वाद उफळला जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणी हरभजन सिंगने स्पष्टीकरण देत सर्वांची माफी सोशल मीडियावर मागितली आहे. 

पंजाब किंग्स संघातील 'या' खेळाडूकडून मात्र सर्मथन

हरभजन सिंगने माफी मागितल्यानंतर पंजाब किंग्स संघातील खेळाडूनं मात्र हरभजन सिंहच्या आधीच्या पोस्टबाबत समर्थन दर्शवलं आहे. युवा ऑलराऊंडर हरप्रीत बरार याने भिंडरावालेला सोशल मीडियावर समर्थन दिलं आहे. त्याने केलेल्या ट्वीटवरून त्याचं समर्थन असल्याचं दिसत आहे.

भज्जीने स्पष्टीकरण देत ट्वीटरवर मागितली माफी

हरभजन सिंगने इन्स्टाग्रामवर खलिस्तानी दहशतवादी जरनॅल सिंह भिंडरावालेला श्रद्धांजली अर्पण केली. याशिवाय त्याला ऑपरेशन ब्लू स्टार दरम्यान शहीद झाल्याचं सांगणारी ही पोस्ट होती. ही पोस्ट इन्स्टावर करणं महागात पडलं असून झालेल्या चुकीबद्दल त्याने माफी मागितली आहे. यासंदर्भात त्याने स्पष्टीकरण देखील दिलं आहे. 
 
'मला कालच्या इन्स्टाग्राम पोस्टबद्दल स्पष्टीकरण द्यायचे आहे आणि त्यासाठी माफी मागायची आहे. हे एक व्हॉट्सअॅप फॉरवर्ड होते जे मी घाईने न वाचताच अर्थ समजून न घेताच पोस्ट केलं. पोस्टमध्ये चित्र काय आहे आणि त्याचा अर्थ काय हे देखील मला दिसले नाही. मी माझी चूक  असून मी ती मान्य करतो असं भज्जीनं म्हटलं आहे. '