Ranji Trophy 2023 Quarter final : रणजी ट्रॉफीचा थरार आता क्वार्टर फायनलपर्यंत जाऊन पोहोचला आहे. बुधवारी म्हणजेच 1 फेब्रुवारी रोजी होळकर स्टेडियममध्ये मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश यांच्यामध्ये दुसऱ्या दिवशीचा खेळ खेळवण्यात आला. या सामन्यामध्ये आंध्र प्रदेशाचा पहिला डाव 397 रन्सवर आटोपला. मात्र टीम इंडियातून बाहेर असलेला स्टार खेळाडू हनुमा विहारीने (Hanuma Vihari) त्याच्या खेळाने चाहत्यांचं मन जिंकून घेतलं आहे.
हाताला दुखापत झाली असून देखील हनुमा विहारी पुन्हा क्रीजवर आला आणि डाव्या हाताने फलंदाजी केली. त्याच्या या कृत्याने चाहते देखील फार हैराण झाले आहेत. विहारीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय.
टीम इंडियाला 2020-21 मध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकवून देणारा हनुमा विहारी रणजी सामन्यादरम्यान गंभीर दुखापतग्रस्त झाला. त्याच्या उजव्या हाताला ही दुखापत झाली असून त्याला प्रचंड वेदनाही होत होत्या. ज्यानंतर त्याला रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर जावं लगालं. मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्या हाताला फ्रॅक्टर झालं होतं. यानंतर आंध्र प्रदेशाच्या टीमला स्कोर करण्याची गरज होती. अशावेळी विहारीने मागचा-पुढचा कोणताच विचार न करता पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात आला.
यावेळी त्याने मैदानावर आल्यानंतर उजव्या हाताने ऐवजी डाव्या हाताने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडिया धुमाकूळ घालतोय. या व्हिडीओमध्ये आवेश खान विहारीला गोलंदाजी करत यॉर्कर बॉल टाकतो. अशातच डाव्या हाताने फलंदाजी करत असताना देखील हनुमा विहारी तो बॉल बाऊंड्री पार नेतो.
Hanuma Vihari one handed batting due to fracture his wrist.#HanumaVihari #INDvsAUSpic.twitter.com/t9hVDTRMmY
— Drink Cricket (@Abdullah__Neaz) February 1, 2023
भारतीय टीमकडून खेळलेला हनुमा विहारी त्याच्या खराब फॉर्ममुळे टीम इंडियातून बाहेर झाला. गेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये हनुमा विहारीने मुख्य भूमिका बजावली होती. त्याच्या फलंदाजीच्या बळावर भारताला ऑस्ट्रेलियाविरूद्धचा सामना ड्रॉ करण्यात यश आलं होतं.
29 वर्षीय बिहारने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेटमध्ये 16 सामने खेळले असून 28 डावामध्ये 33.6 च्या प्रभावी सरासरीने 839 रन्स केलेत. यादरम्यान त्याने 1 शतक आणि 5 अर्धशतकांची खेळी केली आहे.