क्रिकेट विश्वातून मोठी बातमी! ICCच्या अध्यक्षपदी 'या' व्यक्तीला पुन्हा लागली लॉटरी

टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलआधी एक दिवस क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे.

Updated: Nov 12, 2022, 02:49 PM IST
क्रिकेट विश्वातून मोठी बातमी! ICCच्या अध्यक्षपदी 'या' व्यक्तीला पुन्हा लागली लॉटरी title=

Sport News : टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलआधी एक दिवस क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. ICC च्या अध्यक्षपदी ग्रेग बार्कले यांची निवड करण्यात आली आहे. येत्या दोन वर्षांसाठी त्यांची पदावर नियुक्ती केली आहे. याधीचे अध्यक्ष तवेंगवा मुकुहलानी पदावरून पायउतार झाले. ग्रेग बार्कले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड होणे ही एक सन्मानाची गोष्ट आहे. मी माझ्या सहकारी आयसीसी संचालकांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानू इच्छितो, अशी प्रतिक्रिया बार्कले यांनी पुनर्नियुक्तीवर दिली आहे. त्यासोबतच आयसीसीने क्रिकेटच्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्याच्या भविष्यासाठी रोडमॅप तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली असल्याचंही बार्कले यांनी सांगितलं. 

बार्कले हे ऑकलंडचे रहिवासी आहेत. याआधी 2020 साली ग्रेग बार्कले यांनी आयसीसीचं अध्यक्षपद भूषवलं होतं. त्यासोबतच बार्कलेंनी न्यूझीलंडच्या क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि 2015 च्या आयसीसी वनडे वर्ल्ड कपचे संचालक होते. बीसीसीआयनेही बार्कले यांच्या निवडीसाठी पूर्ण पाठिंबा दिला.