Glenn McGrath Pulls Out Snakes : वेस्ट इंडिजचा तो सुवर्णकाळ सरल्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटने आंतरराष्ट्रीय स्तरावर दबदबा निर्माण केला. त्याकाळी ऑस्ट्रेलियाचा सर्वात घातक गोलंदाज कोण? असा सवाल विचारल्यानंतर सर्वांच्या तोंडी एकच नाव येईल, ते म्हणजे ग्लेन मॅकग्रा (Glenn McGrath). मॅकग्राच्या गोलंदाजीला तोड नाही. एकदा का सपाट पट्टा मॅकग्राला मिळाला की, बॅट्समनची खैर नाही. स्वत: क्रिकेटचा देत मॅकग्राच्या दांडपट्ट्यातून वाचला नाहीच. मॅकग्राने आता आंतरराष्ट्रीय स्तरावरून निवृत्ती घेतली आहे. त्यानंतर आता आपल्या कुटुंबासोबत आरामात आयुष्य जगतोय. अशातच आता मॅकग्रासोबत धक्कादायक घटना घडली आहे.
ग्लेन मॅकग्रा ऑसी क्रिकेट संघातून निवृत्ती घेतल्यानंतर स्नेक कॅचर बनल्याचं दिसतंय. 14 वर्षांनंतर खेळातून निवृत्ती घेतल्यानंतर आता मॅकग्रा सोशल मीडियावर अॅक्टिव झालाय. मॅकग्राने अधिकृत सोशल मीडिया खात्यावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो त्याच्या घरातून साप पकडताना दिसतोय. झालं असं की मॅकग्राच्या घरात एक दोन नाही तर तीन भलेमोठे साप शिरले.
मॅकग्राच्या कुटुंबाच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी सापांना बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. त्यांनी हातात जे येईल, त्याने सापांना बाहेर काढलं. त्याचा व्हिडीओ मॅकग्राने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याने तीन कोस्टल कार्पेट अजगर सापांना पकडून त्याच्या घरातून सुरक्षित ठिकाणी हलवलं. आमच्या घरी तीन पाहून आले होते. त्यांना आम्ही सुरक्षित स्थळी हसवलं आहे, असं मॅकग्राने कॅप्टनमध्ये लिहिलं आहे.
दरम्यान, मॅकग्रा सोशल मीडियावर अनेक कमेंट करताना दिसतो. मॅकग्रने यंदाच्या वर्ल्डकप विजयासाठी चार प्रबळ दावेदार असलेल्या संघांची निवड केली होती. ऑस्ट्रेलिया, यजमान भारत, गतविजेते इंग्लंड आणि 1992 वर्ल्डकप विजेते पाकिस्तान या चार संघांची नावं त्याने घेतली होती. त्यावेळी त्याने ऑस्ट्रेलिया संघांचं कौतूक देखील केलं होतं.