ICC World Cup 2023, Gautam Gambhir: युवा खेळाडूंच्या टॅलेंटमुळे सध्या टीम इंडिया (Team India) फॉर्ममध्ये असल्याचं दिसत आहे. भारताने श्रीलंकेविरुद्ध (IND vs SL) खेळल्या गेलेल्या अखेरच्या सामन्यात ऐतिहासिक विजय नोंदवला. श्रीलंकेला (IND vs SL 3rd ODI) तब्बल 317 धावांनी पराभूत करत वनडे क्रिकेटमधील नवा विक्रम रचला आहे. त्यामुळे आता आगामी वर्ल्ड कपसाठी (2023 ODI World Cup) टीम इंडिया शड्डू ठोकून तयार असल्याचं पहायला मिळतंय. अशातच टीम इंडियाचा माजी सलामीवीर खेळाडू गौतम गंभीरने (Gautam Gambhir) मोठं वक्तव्य केलंय. (Gautam Gambhir's choice of Team india spinners for 2023 ODI World Cup marathi news)
गौतम गंभीरने आगामी वनडे वर्ल्ड कपसाठी 4 फिरकीपटूंची (indian spinners) निवड केली आहे, ज्यांचा विश्वचषकासाठी भारतीय संघात समावेश केला जाऊ शकतो. गंभीरने 4 स्पिनरच्या नावांची यादी बोलून दाखवली, जे खेळाडू वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचा (Team india for ODI world Cup 2023) भाग होऊ शकतात. त्यामध्ये गंभीरने स्टार स्पिनर यजुवेंद्र चहलच्या (Yuzvendra Chahal) नावाचा समावेश केला नाही.
गंभीरने ज्या खेळाडूंचा समावेश केलाय, त्यामुळे अक्षर पटेल (Akshar Patel), वॉशिंगटन सुंदर (Washington Sundar), कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि रवि बिश्नोई (Ravi Bishnoi) या चार खेळाडूंची नावं आहेत. युझी चहलला डावलून कुलदीप आणि रवि बिश्नोईचा नाव समोर आल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. चहल कोणत्याही क्षणी सामना फिरवू शकतो. त्यामुळे चहलला संधी मिळणार की नाही?, असा सवाल उपस्थित होताना दिसतोय.
दरम्यान, भारतीय नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयनं (BCCI) या वर्षी भारतात खेळल्या जाणाऱ्या वर्ल्ड कपसाठी 20 खेळाडूंना शॉर्टलिस्ट केलंय. तब्बल 12 वर्षानंतर भारताला एकदिवसीय विश्वचषकाचं यजमानपद मिळालं आहे. त्यामुळे यंदा टीम इंडिया घरच्या मैदानावर वर्ल्ड कप जिंकणार का?, असा सवाल उपस्थित होताना दिसतोय.
रोहित शर्मा (C), ईशान किशन, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार आणि उमरान मलिक.