Team India New Head Coach : कोलकाता नाईट रायडर्सला तिसऱ्यांदा आयपीएलची ट्रॉफी (KKR Won IPL 2024) जिंकून देण्यात सर्वात मोठा वाटा मेंटॉर गौतम गंभीरचा (Gautam Gambhir) राहिलाय. खेळाडूंना कडक शिस्त आणि मार्गदर्शन करण्याचं काम गौतम गंभीरने केलंय. आयपीएल फायनलनंतर गौतमचं अनेकांनी कौतूक केलं. फायनल जिंकल्यावर गौतम गंभीर समोर दिसल्यावर किंग खानने गंभीरची कडकडून गळाभेट घेतली अन् गंभीरच्या माथ्यावर किस केली. त्यावेळी खेळाडूंनी देखील टाळ्या वाजवत गंभीरला यशाचं योगदान दिलंय. केकेआरच्या विजयानंतर आता गौतम गंभीरच टीम इंडियाचा हेड कोच (Team India Head Coach) होणार, अशी चर्चा होताना दिसत होती. अशातच आता मीडिया रिपोर्टमधून मोठी माहिती समोर आली आहे.
क्रिकबझने दिलेल्या रिपोर्टनुसार, बीसीसीआय (BCCI) आणि गौतम गंभीर यांच्यात बोलणं झालं असून लवकर गौतम गंभीरला टीम इंडियाचा हेड कोच बनवलं जाईल. गौतम गंभीर आणि जय शहा (Jay Shah) यांच्यात आयपीएल फायनलनंतर झालेल्या संभाषणानुसार 'आपण देशासाठी देखील हे केलं पाहिजे', असं बोलणं दोघांमध्ये झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता गौतम गंभीरच टीम इंडियाचा कोच होणार का? असा सवाल क्रिडाविश्वात विचारू जावू लागला आहे. जय शहा यांनी आधीच स्पष्ट केलंय की, हेड कोच पदी भारतीय दिग्ग्जाला संधी मिळेल.
दैनिक जागरणने दिलेल्या वृत्तानुसार, गौतम गंभीर टीम इंडियाच्या हेड कोचपदाची जबाबदारी घेण्यास उत्सुक आहे. परंतू त्याने अर्ज भरण्यापूर्वी बीसीसीआयसमोर एक अट ठेवलीये. गौतम गंभीरला संघ निवडण्याची पूर्ण मुभा हवी आहे आणि त्याने सुचवलेले खेळाडू त्याला हवे आहेत, अशी माहिती मीडिया रिपोर्टनुसार समोर आली आहे. याआधी रिकी पाँटिंग, जस्टिन लँगर, स्टीफन फ्लेमिंग यांचीही नावे चर्चेत होती.
दरम्यान, गंभीरने 2007 साली भारताने जिंकलेला टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलबरोबरच 2011 मध्ये जिंकलेल्या एकदिवसीय क्रिकेटचा वर्ल्ड कप फायनलच्या सामन्यात महत्त्वाचं योगदान दिलं होतं. तसेच गंभीरने 2012 आणि 2014 साली दोन वेळा कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएलची ट्रॉफी जिंकून दिलीये.