IND vs SA Test : विराट कोहलीची जागा धोक्यात? गौतम गंभीर म्हणतो 'या' खेळाडूला नंबर 3 वर खेळवा

SA vs IND 1st Test : साऊथ अफ्रिकेच्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना मदत मिळत नाही, त्यामुळे एखाद्याच फिरकी गोलंदाजाला संघात संधी मिळण्याची शक्यता आहे.

सौरभ तळेकर | Updated: Dec 25, 2023, 03:05 PM IST
IND vs SA Test : विराट कोहलीची जागा धोक्यात? गौतम गंभीर म्हणतो 'या' खेळाडूला नंबर 3 वर खेळवा title=
Gautam Gambhir

Gautam Gambhir On India Playing 11 :  टी-ट्वेंटी आणि वनडे मालिकेनंतर आता साऊथ अफ्रिकेविरुद्ध 2 कसोटी सामन्यांची मालिका (IND vs SA Test Series) खेळवली जाणार आहे. सेंच्युरियनमध्ये पहिला कसोटी सामना 26 डिसेंबर रोजी खेळवला जाईल. वर्ल्ड कपनंतर पहिल्यांदाच टीम इंडिया रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली खेळणार असल्याने आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच आता टीम इंडियामध्ये कोणाला संधी मिळणार? यावर माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने मोठं वक्तव्य केलं आहे.

गौतम गंभीरने टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल? यावर मोठं भाकित केलंय. त्यावेळी त्याने त्याची आवडता संघ देखील निवडला. गंभीरने रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांची सलामीवीर म्हणून निवड केलीये. तर गंभीरने विराटच्या जागी एका दुसऱ्या खेळाडूची निवड केली आहे. गंभीरने तिसऱ्या क्रमांकासाठी शुभमन गिलची निवड केलीये. तर चौथ्या स्थानी विराट कोहलीला स्थान दिलंय. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि केएल राहुल अनुक्रमे नंबर 5 आणि नंबर  6 ची जागा सांभाळतील, असं गौतम गंभीर म्हणतो.

गौतम गंभीरने यावेळी गोलंदाजांची देखील निवड केली. रवींद्र जडेजा आणि आर अश्विन या दोन्हीपैकी कोणाही एका खेळाडूला निवडावं लागेल, असं गौतम गंभीर म्हणतो. तर शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज या चार फास्टर गोलंदाजांना गंभीरने प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा दिलीये. 

आणखी वाचा - IND vs SA Test : वर्ल्ड कपचा पराभव रोहितच्या जिव्हारी, Rahul Dravid म्हणतात "प्रत्येक वेळी तुम्ही..."

दरम्यान, साऊथ अफ्रिकेच्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना मदत मिळत नाही, त्यामुळे एखाद्याच फिरकी गोलंदाजाला संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये रविंद्र जडेजावर जास्त भर असेल, असे संकेत देखील मिळत आहेत. आम्ही खेळपट्टीला अनुकूल असेल गोलंदाज निवडू, असं राहुल द्रविड यांनी सांगितलं होतं. 

गौतम गंभीरने निवडलेली प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा/आर अश्विन, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज.