Gautam Gambhir IND VS AUS : न्यूझीलंड विरुद्ध घरच्या मैदानावर टीम इंडियाचा (Team India) 0-3 ने लाजिरवाणा पराभव झाल्यावर BCCI आता ऍक्शन मोडमध्ये आलेली आहे. शुक्रवारी 8 नोव्हेंबर रोजी बीसीसीआयच्या बोर्ड अधिकाऱ्यांनी रिव्ह्यू मिटिंग घेतली असून यात रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि चीफ सिलेक्टर अजित आगरकर इत्यादी उपस्थित होते. तब्बल 6 तास चाललेल्या या मीटिंगमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली ज्यातला एक विषय हा गौतम गंभीर (Gautam Gambhir) याची कोचिंग स्टाईल हा सुद्धा होता. बीसीसीआयचे अधिकारी याबाबत नाराज होते की बुमराहला तिसऱ्या टेस्टमध्ये आराम देण्यात आला आणि पुण्यातील अशाच खेळपट्टीवर पराभूत होऊनही संघाने 'रँक टर्नर' चा पर्याय का निवडला होता.
मीडिया रिपोर्ट्स समोर आले असून यात सांगण्यात आलंय की टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि टीम इंडियाच्या मॅनेजमेंट टीममध्ये अनेक मुद्द्यांवर एकमत नाही. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडियात ऑल राउंडर नितीश कुमार रेड्डी आणि वेगवान गोलंदाज हर्षित राणा यांची निवड करण्यामागे गंभीरच होता मात्र, या निर्णयाने मॅनेजमेंट टीम खुश नाही. 6 तास चाललेल्या या बैठकीत बीसीसीआयला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडिया विजयी पथावर परतेल याची खात्री करायची होती, अन्यथा गंभीरवर कठोर कारवाई केली जाऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे.
हेही वाचा : भारत - दक्षिण आफ्रिका Live सामन्यात राडा, 6.8 फूट उंच खेळाडूशी भिडला सूर्या, नेमकं काय घडलं?
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे सामने 22 नोव्हेंबर पासून सुरु होणार आहेत. टीम इंडिया 10 आणि 11 नोव्हेंबर रोजी दोन तुकड्यांमध्ये ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हा टीम इंडियाच्या पहिल्या तुकडीसोबत ऑस्ट्रेलियाला रवाना होईल. दैनिक जागरणच्या रिपोर्टनुसार ऑस्ट्रेलियाचा हा दौरा मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरसाठी शेवटची संधी असेल. जर या फॉरमॅटमध्ये गंभीरच्या नेतृत्वात टीम इंडियाची कामगिरी सुधारली नाही तर मात्र बीसीसीआय टेस्ट आणि वनडे - टी 20 फॉरमॅटसाठी दोन वेगवेगळ्या प्रशिक्षकांची नेमणूक करेल. सूत्रांच्या माहितीनुसार ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाला यश मिळाले नाही तर टेस्ट फॉरमॅटसाठी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी ही व्हीव्हीएस लक्ष्मणकडे सोपवली जाईल. तर वनडे आणि टी 20 फॉरमॅटसाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर कायम राहील.
हेही वाचा : चॅम्पियन्स ट्रॉफी संदर्भात भारताचा मोठा निर्णय, पाकिस्तानला आणलं गुडघ्यावर, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, आर जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर