गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा हेड कोच, जय शहा यांनी जाहीर केलं नाव, म्हणाले...

New head coach of Team India : राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपल्यानंतर आता गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा हेड कोच झाला आहे. बीसीसीआय सचिव जय शहा यांनी ट्विट करत याची माहिती दिली.

सौरभ तळेकर | Updated: Jul 9, 2024, 08:26 PM IST
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा हेड कोच, जय शहा यांनी जाहीर केलं नाव, म्हणाले... title=
Gautam Gambhir become new head coach

Gautam Gambhir become Team India head coach : टीम इंडियाचा माजी सलामीवीर खेळाडू आणि कोलकाता नाईट रायडर्सचा प्रशिक्षक गौतम गंभीर याची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गौतम गंभीर आता राहुल द्रविडचा वारसा पुढे चालवणार आहे. बीसीसीआय सचिव जय शहा यांनी याची घोषणा केली. गौतम गंभीर याचं गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होतं. अशातच आता गौतम गंभीरच्या मार्गदर्शनासाठी टीम इंडिया आगामी स्पर्धेत भाग घेईल.

Jay shah काय म्हणाले?

मला अत्यंत आनंद होत आहे की, गौतम गंभीर यांना भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केलं आहे. आधुनिक काळातील क्रिकेट झपाट्याने विकसित झाले आहे आणि गौतमने या बदलत्या लँडस्केपचा जवळून साक्षीदार आहे. त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत विविध भूमिकांमध्ये दमछाक सहन करून आणि उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे, मला विश्वास आहे की गौतम भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी आदर्श व्यक्ती आहे, असं जय शहा यांनी म्हटलं आहे.

टीम इंडियासाठी त्याची स्पष्ट दृष्टी, त्याच्या अफाट अनुभवासह, त्याला ही रोमांचक आणि सर्वाधिक मागणी असलेली कोचिंग भूमिका पार पाडण्यासाठी उत्तम प्रकारे स्थान देतंय. बीसीसीआय गौतमला नवीन प्रवासाला सुरुवात करताना पूर्ण पाठिंबा देत आहे, असंही जय शहा यांनी ट्विट करत म्हटलं आहे.

गौतम गंभीरची यशस्वी कारकीर्द

गौतम गंभीर टीम इंडियासाठी खेळला आणि झुंजला सुद्धा... 2007 च्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये गौतम गंभीरचा समावेश होता. तर 2011 मध्ये वनडे वर्ल्ड विजयाचा हिरो गंभीर देखील होता. फायनल सामन्यातील गौतम गंभीरची 97 धावांची खेळी कोणीही विसरू शकत नाही. एवढंच नाही तर आयपीएलमध्ये देखील गंभीरने चमक दाखवलीये. 2012 आणि 2014 मध्ये गंभीरने कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएलची ट्रॉफी जिंकून दिली. तर 2024 मध्ये म्हणजेच मागच्या आयपीएलमध्ये गंभीरने केकेआरला विजयाचा मार्ग दाखवला होता.