ऑस्ट्रेलियाविरुद्ध हॅट्रिक करणाऱ्या कुलदीपसाठी गंभीरचा स्पेशल मेसेज

कोलकाताच्या ईडन गार्डनवर गुरुवारी खेळवण्यात आलेल्या भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात भारताने शानदार विजय मिळवला. या सामन्यात कुलदीप यादवने ५४ धावा देताना तीन विकेट घेतल्या. 

Updated: Sep 22, 2017, 03:11 PM IST
ऑस्ट्रेलियाविरुद्ध हॅट्रिक करणाऱ्या कुलदीपसाठी गंभीरचा स्पेशल मेसेज title=

कोलकाता : कोलकाताच्या ईडन गार्डनवर गुरुवारी खेळवण्यात आलेल्या भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात भारताने शानदार विजय मिळवला. या सामन्यात कुलदीप यादवने ५४ धावा देताना तीन विकेट घेतल्या. 

वनडेमध्ये हॅट्रिक करणारा कुलदीप तिसरा भारतीय गोलंदाज ठरलाय. त्याच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जातेय. भारताच्या अनेक क्रिकेटरर्सनी ट्विटरवरुन कुलदीपचे कौतुक केलेय. 

क्रिकेटर गंभीरने तर कुलदीपसाठी स्पेशल मेसेज केलाय. कुलदीपची स्तुती करताना गंभीर म्हणाला, कोलकाता नाईट रायडरचा जांभळ्या रंगाचा ड्रेस बीसीसीआयच्या निळ्या रंगात बदललाय मात्र तुझ्या गोलंदाजीची शैली तीच आहे...ब्राव्हो.

गंभीरसह माजी क्रिकेटर संजय मांजरेकर, सुरेश रैना, शिखर धवन यांनीही ट्विट करुन कुलदीपचे कौतुक केलेय.