दिल्ली : आयपीएलमध्ये दिल्लीकडून खेळणाऱ्या गब्बर शिखर धवनने रेकॉर्ड केला आहे. हा रेकॉर्ड करणारा तो आयपीएलमधील पहिलाच खेळाडू ठरला आहे. शिखर धवनने आयपीएलमध्ये सर्वाधिक फोर मारण्याची कामगिरी केली आहे. सर्वाधिक फोर मारण्याची ही कामगिरी धवनने २० एप्रिलला पंजाब विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये केली आहे. धवनने आयपीएलमध्ये आतापर्यंत ५०२ फोर मारले आहेत. त्यामुळे आयपीएलमध्ये ५०० फोरचा टप्पा गाठण्याचा शिखर धवनने मान मिळवला आहे.
Gabbar and his boundary hitting abilities!
Dilliwalon, how many more fours will he hit today?#DCvKXIP #ThisIsNewDelhi #DelhiCapitals @SDhawan25 pic.twitter.com/cccwliaENE
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 20, 2019
शिखर धवनला यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली खेळी करण्यासाठी फार वेळ वाट पाहावी लागली. पंजाब विरुद्धच्या मॅचमध्ये धवनला सूर गवसला. धवनने पंजाब विरुद्ध अर्धशतकी खेळी केली. त्याने ४१ बॉलमध्ये 56 रन केले. यामध्ये त्याने ७ फोर आणि १ सिक्स लगावला. या खेळीसोबतच धवनने ५०० फोरचा टप्पादेखील पूर्ण केला.
आयपीएलमध्ये सर्वाधिक फोर मारण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर गौतम गंभीरचा नंबर लागतो. गंभीरने ४९१ फोर लगावले आहेत. पण गंभीरने निवृत्ती घेतल्याने शिखर धवनच्या या रेकॉर्डजवळ कोणीच नाही.
सर्वाधिक फोर मारण्याच्या बाबतीत धवनच्या रेकॉर्डजवळ सुरेश रैना आणि विराट कोहली हे दोघे आसपास आहेत. चेन्नईकडून खेळणाऱ्या सुरेश रैनाने आतापर्यंत एकूण ४७३ फोर मारले आहेत. तर चौथ्या क्रमांकावर भारताचा आणि बंगळुरु टीमचा कॅप्टन विराट कोहली विराजमान आहे. विराट कोहलीने ४७१ वेळा बॉलला बाऊंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं आहे.
सुरेश रैना आणि विराट कोहली यांच्यातील तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकामध्ये केवळ २ फोरचे अंतर आहे. त्यामुळे यापैकी दोन्ही खेळाडू एकमेकांना पिछाडीवर टाकू शकतात. दोन्ही खेळाडू सध्या चांगली खेळी करत आहेत. तसेच दोन्ही स्फोटक खेळण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे या दोघांपैकी कोण शिखर धवनचा रेकॉर्डला मोडित काढेल हे औत्सुक्याचे ठरणार आहे.