IPL 2019: मंकडिंगचा प्रयत्न करणाऱ्या अश्विनला धवनने चिडवलं

शनिवारी २० एप्रिलला पंजाब आणि दिल्ली यांच्यात सुरु असलेल्या मॅचदरम्यान हा किस्सा पाहायला मिळाला. 

Updated: Apr 21, 2019, 09:11 PM IST
IPL 2019: मंकडिंगचा प्रयत्न करणाऱ्या अश्विनला धवनने चिडवलं title=

दिल्ली : आयपीएलचा यंदाचा मोसम नेहमीप्रमाणेच वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत राहिलयं. आयपीएलची मॅच खेळाबरोबरच मॅचदरम्यान होणाऱ्या किश्श्यांमुळे चर्चेत असते. मग ते ११ एप्रिलला राजस्थान विरुद्ध चेन्नई दरम्यान धोनीने रविंद्र जडेजाच्या डोक्यावर मस्करीत मारलेला बॅटचा किस्सा किंवा अश्विनचे जॉस बटलरला केलेले मंकडिंग. 

या हटके किश्श्यांमध्ये आता शिखर धवनच्या डान्सची भर पडली आहे. शनिवारी २० एप्रिलला पंजाब आणि दिल्ली यांच्यात सुरु असलेल्या मॅचदरम्यान दुसऱ्या इनिंगमध्ये दिल्लीच्या बॅटिंग दरम्यान हा किस्सा पाहायला मिळाला. 

 

 

दिल्लीने टॉस जिंकून पंजाबला बॅटिंगसाठी आमंत्रित केले. पंजाबने दिल्लीला विजयासाठी १६४ रनचे आव्हान दिले होते. मॅचची १३ वी ओव्हर टाकण्यासाठी पंजाबचा कॅप्टन आर आश्विन आला. ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर हा सर्व प्रकार पाहायला मिळाला. दिल्लीकडून स्ट्राईकवर श्रेयस अय्यर खेळत होता. तर नॉन स्ट्राईकला शिखर धवन होता. आश्विनला त्याच्याच स्टाईलने (मंकडिंग) चकवा देण्याच्या तय़ारीत धवन होता. 

ओव्हरचा तिसरा बॉल टाकायला रनअप घेत आश्विन पुढे तर आला पण त्याने बॉ़ल टाकला नाही. आश्विनने बॉल न टाकल्यामुळे तो आपल्यालाही बटलर सारखच मंकडिंग करु नये म्हणून त्याने आधीच सावधरित्या बॅट क्रीझमध्ये ठेवली होती. आश्विन पुढील बॉ़ल टाकण्यासाठी मागे जात असताना शिखर धवनने त्याला डिवचण्यासाठी भर मैदानात डान्स करुन दाखवला. धवनच्या या डान्सचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान दिल्लीने ही मॅच ५ विकेटन जिंकली. शिखर धवनने ५६ रनची मह्त्वपूर्ण खेळी केली. आश्विनला डिवचल्याचा वचपा आश्विनने शिखर धवनने आऊट करत घेतला.