टी20 वर्ल्डकपआधी कॅप्टन रोहितचं टेन्शन वाढलं, 'या' खेळाडूच्या तुफान बॅटिंगचा VIDEO पाहून सगळेच चक्रावले

भावा कडक! 17 षटकार-10 चौकार....18 वर्षीय क्रिकेटरची कमाल, पाहा VIDEO

Updated: Jul 29, 2022, 03:16 PM IST
टी20 वर्ल्डकपआधी कॅप्टन रोहितचं टेन्शन वाढलं, 'या' खेळाडूच्या तुफान बॅटिंगचा VIDEO पाहून सगळेच चक्रावले title=

मुंबई : टी20 वर्ल्डकपआधी एका य़ुवा खेळाडूने चांगलाच दमखम दाखवला आहे. या खेळाडूच्या नावावर आधीच कमी वयात टी20 शतक झळकावल्याचा विक्रम होता. आता पुन्हा या खेळाडूने फलंदाजीची चमक दाखवत शतक ठोकलं आहे. या त्याच्या खेळीने टी20 विश्वचषकाआधी अनेक संघाना घाम फोडलाय. त्यामुळे हा खेळाडू आहे तरी कोण अशी चर्चा सुरु झालीय.  

 फ्रेंच फलंदाज गुस्ताव मॅकॉनने सर्वात कमी वयात टी-20त शतक झळकावलं होतं. त्यानंतर आता पुन्हा त्याने 
युरोपियन T20 विश्वचषक पात्रता सामन्यात आणखी एक शतक झळकावलं आहे. वांटामध्ये स्वित्झर्लंडविरुद्ध शतक झळकावणाऱ्या या खेळाडूने बुधवारी नॉर्वेविरुद्धही शतक झळकावले आणि त्यामुळे गुस्तावच्या नावावर आणखी एक विश्वविक्रम झाला. मॅकॉनने नॉर्वेविरुद्ध 101 धावा आणि स्वित्झर्लंडविरुद्ध 109 धावांची धडाकेबाज खेळी केली होती.

विश्वविक्रम
गुस्ताव मॅकॉनने सलग दोन टी-20 शतकांसह एक मोठा विश्वविक्रम केला आहे. सलग दोन टी-20 शतके झळकावणारा गुस्ताव हा एकमेव क्रिकेटर ठरला आहे. गुस्ताव मॅकॉनने दोन डावात 210 धावा केल्या आहेत.  स्वित्झर्लंडविरुद्ध त्याने 9 षटकार तर नॉर्वेविरुद्ध 8 षटकार मारले होते.

शतक ठोकूनही टीमला हरवलं 
स्वित्झर्लंडविरुद्ध शतक झळकावल्यानंतरही गुस्ताव आपल्या संघाच्या पराभवाचे कारण बनला होता. गुस्तावने गोलंदाजीत खराब कामगिरी करून फ्रान्सचा विजय हिरावला. T20 सामन्यात गुस्तावला शेवटच्या षटकात 16 धावा वाचवायच्या होत्या पण तो तसे करू शकला नाही. शेवटच्या चेंडूवर स्वित्झर्लंडला 4 धावांची गरज होती आणि गुस्तावला खेळाडूने चौकार लगावला.परिणामी फ्रान्सने हा सामना एका विकेटने गमावला. नॉर्वेविरुद्ध याच्या विपरीत घडले. गुस्तावने प्रथम फलंदाजी आणि नंतर गोलंदाजीत 4 षटकात 27 धावा देत 3 बळी घेतले. फ्रान्सने नॉर्वेवर 11 धावांनी विजय मिळवला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

गुस्ताव मॅकॉनने आतापर्यंत फक्त तीन टी-२० सामने खेळले आहेत आणि तिन्ही सामन्यांमध्ये त्याच्या बॅटने अर्धशतक किंवा शतक झळकावले आहे. या खेळाडूने 3 सामन्यात 95 पेक्षा जास्त सरासरीने 286 धावा केल्या आहेत. स्ट्राइक रेट देखील 170 च्या पुढे आहे. त्यामुळे त्याच्या फलंदाजीने सर्वांनाच घाम फोडला आहे.