टीम इंडियाच्या स्टार खेळाडूच्या वडिलांचं निधन

टीम इंडियाचा माजी स्टार क्रिकेटपटू सुरेश रैनाचे (Suresh Raina) वडील त्रिलोकचंद रैना यांचं निधन झालं आहे.   

Updated: Feb 6, 2022, 07:14 PM IST
टीम इंडियाच्या स्टार खेळाडूच्या वडिलांचं निधन title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : टीम इंडियाचा माजी क्रिकेटर सुरेश रैनावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. सुरेश रैनाच्या वडिलांचे निधन झालं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्रिलोकचंद रैना यांचं कॅन्सरमुळे निधन झालं. त्यांनी त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्रिलोकचंद यांच्यावर अनेक दिवसांपासून उपचार सुरु होते. मात्र कॅन्सर विरुद्धची झुंज अपयशी ठरली. (former team india cricketer suresh raina father trilokchand raina passed away) 

सुरेश रैना गेल्या अनेक दिवसांपासून गाजियाबादमधील राजनगर येथील राहत्या घरी वडिलांची सेवा करत होता. रैनाच्या वडिलांना गेल्या अनेक महिन्यांपासून कॅन्सरचा संसर्ग झाला होता. मात्र डिसेंबर 2021 पासून त्यांची प्रकृती आणखी खालावली होती.

रैनाचे वडील त्रिलोकचंद हे भारतीय लष्करात होते. त्रिलोकचंद हे बॉम्ब बनवण्यात माहिर होते. त्रिलोकचंदर यांचं मूळ गाव हे जम्मू काश्मिरमधील रैनावारी हे होतं. ते काश्मिरी पंडित होते. मात्र 90 च्या दशकात कश्मिरी पंडितांच्या हत्या करण्यात आल्या. यामुळे त्यांनी मूळ गाव सोडण्याचा निर्णय घेतला होता. 

रैनाची धोनीसोबतच निवृत्ती 

दरम्यान रैनाने 15 ऑगस्ट 2020 ला महेंद्र सिंह धोनीसोबतच निवृत्ती घेतली होती. रैनाने एकूण 18 कसोटी, 226 वनडे आणि 78 टी 20 सामन्यात टीम इंडियाचं नेतृत्व केलं होतं.