माजी स्टार क्रिकेटर युवराज-हेजल झालेत आई-बाबा

टीम इंडियाचा  (Team India) माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याच्या (Yuvraj Singh) घराघरात नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे.  

Updated: Jan 26, 2022, 07:45 AM IST
माजी स्टार क्रिकेटर युवराज-हेजल झालेत आई-बाबा title=

मुंबई : टीम इंडियाचा  (Team India) माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याच्या (Yuvraj Singh) घराघरात नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. त्याची पत्नी हेजल कीच हिने (Hazel Keech) एका मुलाला जन्म दिला. या सेलिब्रिटी जोडप्याने 25 जानेवारीच्या रात्री सोशल मीडिया अकाउंटवरुन ही माहिती दिली.

छोट्याशा जानचे या जगात स्वागत 

युवराज सिंगने ट्विटरवर लिहिले की, 'आमचे सर्व चाहते, कुटुंब आणि मित्रांनो, आम्हाला ही बातमी सांगताना खूप आनंद होत आहे की, देवाने आम्हाला मुलगा दिला आहे. या भेटीबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो आणि आशा करतो की या छोट्याशा जानचे या जगात स्वागत करताना आमच्या गोपनीयतेची काळजी घेतली जाईल. बॉलिवूड अभिनेत्री हेजल कीचनेही तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हाच संदेश पोस्ट केला आहे.

इरफान पठाण यांने केले अभिनंदन 

या आनंदाच्या बातमीनंतर युवराज सिंग आणि हेजल कीच यांचे चाहते आणि अनेक सेलिब्रिटींकडून अभिनंदन केले जात आहे. युवीचा मित्र आणि माजी क्रिकेटपटू इरफान पठाण (Irfan Pathan) याने लिहिले की, 'भाऊचे खूप खूप अभिनंदन. मला खात्री आहे की तू एक अद्भुत पिता आहेस. छोट्याला खूप प्रेम, वहिनींना सन्मान.

2016 मध्ये त्यांचे लग्न  

युवराज सिंग आणि हेजल कीच यांची 2015 मध्ये एंगेजमेंट झाली होती. 30 नोव्हेंबर 2016 रोजी फतेहगढ साहिब गुरुद्वारामध्ये या जोडप्याचा विवाह झाला.

'हेजलचे मन वळवणे सोपे नव्हते'

हेजल कीचसोबत लग्न करण्यासाठी युवराज सिंगला खूप संघर्ष करावा लागला. एका मुलाखतीत युवीने सांगितले होते की, हेजलचे मन वळवण्यासाठी त्याने खूप प्रयत्न केले होते. तब्बल तीन महिन्यांनंतर हेजलने सोशल मीडियावर त्याची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्याचे त्याने सांगितले होते.

युवी हा चॅम्पियन क्रिकेटर

भारताच्या यशस्वी क्रिकेटपटूंमध्ये युवराज सिंग याची गणना केली जाऊ शकते. तो T20 वर्ल्ड कप 2007 आणि ODI वर्ल्ड 2011 च्या चॅम्पियन टीमचा भाग होता. 10 जून 2019 रोजी या चॅम्पियन खेळाडूने क्रिकेटला अलविदा केला.