MS Dhoni: 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये धोनीनेच रोहितला डावललं; माजी सिलेक्टरचा धक्कादायक खुलासा!

Raja Venkat Over 2011 ODI World Cup: आम्ही टीम सिलेक्शनसाठी बसलो होतो, तेव्हा रोहित शर्मा (Rohit Sharma) आमच्या प्लॅनमध्ये होता. कर्णधार धोनीला (MS Dhoni) पियुष चावलाला संघात ठेवायचं होतं, त्यामुळे कर्स्टननेही आपला निर्णय बदलला, असं राजा व्यंकट यांनी म्हटलं आहे.

Updated: Aug 22, 2023, 06:35 PM IST
MS Dhoni: 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये धोनीनेच रोहितला डावललं; माजी सिलेक्टरचा धक्कादायक खुलासा! title=
MS Dhoni, Rohit Sharma

Raja Venkat On Rohit Sharma: यंदाचा वर्ल्ड कप भारतात खेळवला जाणार आहे. 12 वर्षांपूर्वी म्हणजेच 2011 साली भारतात वर्ल्ड कप आयोजित करण्यात आला होता. धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली टीम इंडियाने हा वर्ल्ड कप जिंकला देखील होता. अशातच भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू तसेच 2010 ते 2012 या काळात निवड समिती सदस्य राहिलेल्या राजा व्यंकट (Raja Venkat) यांनी नुकतीच एका मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांनी 2011 वनडे वर्ल्डच्या (ICC Cricket World Cup) संघाबाबत एक मोठा खुलासा केला आहे.

2011 साली नेमकं काय झालं?

आम्ही टीम सिलेक्शनसाठी बसलो होतो, तेव्हा रोहित शर्मा आमच्या प्लॅनमध्ये होता. वर्ल्ड कपआधी टीम इंडिया दक्षिण अफ्रिकेमध्ये होती, त्यामुळे यशपाल शर्मा आणि मी त्यावेळी दक्षिण आफ्रिकेत होतो. बाकीचे तीन सिलेक्टर्स म्हणजेच श्रीकांत, सुरेंद्र भावे आणि नरेंद्र हिरवाणी चेन्नईत होते. आम्ही संघ निवडताना 1 ते 14 पर्यंतच्या प्रत्येक खेळाडूचं नावं पॅनेलने स्वीकारलं होतं. पहिल्या 14 खेळाडूंमध्ये रोहित शर्माचं नाव नव्हतं.

आम्ही सर्वांनी मिळून 15 व्या क्रमांकावर आम्ही रोहितचं नाव सुचवलं होतं.  त्यावेळी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन होते. गॅरी कर्स्टन यांनाही ही योग्य निवड असल्याचं वाटलं होतं. पण कर्णधार धोनीला पियुष चावलाला संघात ठेवायचं होतं, त्यामुळे कर्स्टननेही आपला निर्णय बदलला, असं राजा व्यंकट यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या निर्णयामुळे रोहित शर्माला संघाबाहेर व्हावं लागलं, असंही राजा व्यंकट यांनी म्हटलंय.

आणखी वाचा - MS Dhoni: तेव्हा कॅप्टन धोनी गंभीरला काय म्हणाला होता? 11 वर्षानंतर केला खुलासा!

दरम्यान , 2011 वर्ल्डकप आपल्या सर्वांसाठी एक आनंदाचा क्षण होता. मला अजूनही आठवतंय की तो वर्ल्डकप मी घरी बसून पाहिला होता. त्यावेळी टाकलेला आणि खेळलेला प्रत्येक चेंडू मला आठवतोय. त्यावेळी माझ्या मनात दोन भावना होत्या. माझा टीममध्ये समावेश केला गेला नसल्याने मी काहीसा निराश होतो. त्यामुळे मी निर्णय घेतला होता की, मी वर्ल्डकप पाहणार नाही, असं रोहित शर्मा म्हणाला होता. 2015 आणि 2019 च्या वनडे वर्ल्डकप खेळून मला खूप छान वाटलं होतं. तर आता आम्ही वर्ल्ड कपसाठी तयार आहोत, असंही रोहित शर्मा म्हणाला आहे.