IPL मध्ये कमेंट्री करणारे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचं मुंबईत निधन

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचं मुंबईत निधन

Updated: Sep 24, 2020, 04:26 PM IST
IPL मध्ये कमेंट्री करणारे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचं मुंबईत निधन title=

मुंबई : ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचं मुंबईत निधन झालं आहे. हार्टअटॅकमुळे वयाच्या 59 व्या वर्षी डीन जोन्स यांचं निधन झालं. कोच आणि कॉमेंटेटर म्हणून त्यांनी भूमिका बजावल्या आहेत. सध्या ते IPL च्या कॉमेंट्रीसाठी मुंबईत होते. डीन जोन्स (Dean Jones) सोशल मीडियावर देखील खूप अॅक्टीव होते. ऑस्टेलियाचा माजी गोलंदाज ब्रेट लीने याबाबत माहिती दिली. 

डीन जोन्स हे ऑस्‍ट्रेलियाच्या दिज्जग खेळाडूंमध्ये मोजले जातात. त्यांनी 52 टेस्‍ट, 164 वनडे इंटरनॅशनल सामने खेळले आहेत. टेस्‍टमध्ये 216 आणि वनड मध्ये 145 रन त्यांचा सर्वोत्कृष्ट स्कोर आहे. टेस्‍ट क्रिकेटमध्ये 46.55 च्या रनरेटने त्यांनी 3631 रन केले आहेत ज्यामध्ये 1 शतक आणि 14 अर्धशतकांचा समावेश आहे.

वनडेमध्ये त्यांनी 44.61 च्या रनरेटने 6068 रन केले आहे. ज्यामध्ये 7 शतक आणि 46 अर्धशतकांचा समावेश आहे. जोन्स यांनी टेस्टमध्ये 34 आणि वनडेमध्ये 54 कॅच पकडले आहेत. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्यांनी 245 सामन्यांमध्ये 19,188 रन केले आहेत. त्यांनी नाबाद 324 रनची सर्वोत्कृष्ट खेळी केली होती.

जोन्सने टेस्‍ट क्रिकेटमध्ये 2 दुहेरी शतक ठोकले होते. ज्यामध्ये चेन्नईमध्ये भारताच्या विरुद्ध 1986 मध्ये 210 रनची खेळी केली होती.