माजी क्रिकेटपटू चंद्रशेखर यांचे चेन्नईत निधन

भारताचे माजी क्रिकेटपटू व्ही. बी. चंद्रशेखर यांचे  हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

Updated: Aug 16, 2019, 08:49 AM IST
माजी क्रिकेटपटू चंद्रशेखर यांचे चेन्नईत निधन title=
Pic Courtesy : VB Chandrasekhar | Facebook

मुंबई : भारताचे माजी क्रिकेटपटू व्ही. बी. चंद्रशेखर यांचे चेन्नईमध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते. आक्रमक फलंदाजीसाठी व्ही. बी. चंद्रशेखर ओळखले जायचे. क्रिकेट वर्तुळात ते व्हीबी नावाने ओळखले जायचे. 

भारतीय संघाकडून ते ७ एकदिवसीय सामने खेळले. मात्र प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये व्ही.बी.चंद्रशेखर यांचा मोठा दबदबा होता. १९८८मध्ये इराणी चषकात तामिळनाडूकडून खेळताना ५६ चेंडूत १०० धावांची विक्रमी खेळी केली होती. 

भारतातील क्रिेकेटमधील हे सर्वात वेगवान शतक ठरले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर निवड समिती सदस्य, प्रशिक्षक आणि समालोचक अशी विविध माध्यमांतून त्यांनी आपले क्रिकेटशी नाते जपले आहे.