IPL 2025 : युवराज सिंहची आयपीएलमध्ये पुन्हा एंट्री! 'या' टीम सोबत जोडला जाणार

माजी क्रिकेटर युवराज सिंहच्या फॅन्ससाठी आता आनंदाची बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार युवराज सिंह लवकरच इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिसू शकतो.

Updated: Aug 26, 2024, 01:07 PM IST
IPL 2025 : युवराज सिंहची आयपीएलमध्ये पुन्हा एंट्री! 'या' टीम सोबत जोडला जाणार  title=
(Photo Credit : Social Media)

Yuvraj Singh May Return In IPL : भारताचा माजी क्रिकेटर युवराज सिंहच्या फॅन्ससाठी आता आनंदाची बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार युवराज सिंह लवकरच इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिसू शकतो. जवळपास 5 वर्षांपूर्वी युवराज सिंहने आयपीएलमधून निवृत्ती घेतली होती. मात्र आता तो आयपीएलच्या एका प्रसिद्ध टीमचा कोच म्हणून दिसू शकतो. समोर येत असलेल्या माहितीनुसार आयपीएल फ्रेंचायझी दिल्ली कॅपिटल्सने युवराज सिंह सोबत संपर्क केला आहे. जर सर्व काही ठीक झाले, तर युवराज सिंह दिल्ली कॅपिटल्सचा मेंटॉर सौरव गांगुली सोबत काम करताना दिसू शकतो. 

मागील तीन वर्षांपासून आयपीएल टूर्नामेंटमध्ये दिल्ली कॅपिटल्सचं प्रदर्शन खराब राहील आहे. दिल्ली कॅपिटल्स आतापर्यंत एकदाही आयपीएलचे विजेतेपद पटकावू शकली नाही. तर आयपीएल 2024 मध्ये सुद्धा प्लेऑफमध्ये क्वालिफाय होण्याची संधी थोडक्यात हुकली. याच कारणामुळे आता दिल्ली कॅपिटल्स फ्रेंचायझी आयपीएल 2025 पूर्वी ऍक्शन मोडमध्ये आली आहे. मागील काही वर्ष दिल्ली कॅपिटल्सचा हेड कोच राहिलेला रिकी पॉन्टिंग आता फार ऍक्टिव्ह दिसत नाही. तसेच त्याने गेल्यावर्षी संकेत दिले होते की दिल्ली फ्रेंचायझी आता हेड कोच म्हणून त्यांचा कार्यकाळ वाढवू इच्छित नाही.

हेही वाचा : 'एका रात्रीत नोटबंदी, लॉकडाऊन; मग....' कोलकाता रेप केसवर भडकली प्रसिद्ध क्रिकेटरची पत्नी

 

पॉन्टिंगकडून मिळालेले संकेत आणि मीडिया रिपोर्ट्समधून मिळालेली माहिती आता खरी असल्याचे स्पष्ट होत आहे. युवराज दिल्ली कॅपिटल्सचा हेड कोच बनला तर त्याच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनाखाली टीमचा परफॉर्मन्स सुधारू शकतो अशी आशा आहे. 

युवराज सिंहला टी 20 क्रिकेटचा एक्सपर्ट मानलं जातं. त्याने यापूर्वी आयपीएलमध्ये दमदार प्रदर्शन केले होते. युवराजने आयपीएलमध्ये आतापर्यंत विविध फ्रेंचायझीकडून खेळताना 132 सामने खेळले यात त्याने 2750 धावा केल्या. आयपीएलमध्ये युवराजच्या नावावर 13 अर्धशतकांचा समावेश आहे. युवराज हा ऑल राउंडर खेळाडू आहे. त्याने आयपीएलमध्ये जबरदस्त फलंदाजी करण्यासोबतच 73 इनिंग्समध्ये 29.92 च्या सरासरीने 36 विकेट्स घेतले. आयपीएलमध्ये त्याच्या गोलंदाजीचे सर्वोत्तम प्रदर्शन 29 धावा देत 4 विकेट्स होते. 

युवराज सिंहवर येणार चित्रपट : 

सचिन तेंडुलकर, एम एस धोनी यानंतर आता माजी क्रिकेटर युवराज सिंहच्या आयुष्यावर सुद्धा लवकरच एक चित्रपट येणार आहे. युवराज सिंगचे आयुष्य मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी भूषण कुमार आणि निर्माता रवी भागचंदका एकत्र येत आहेत. काही दिवसांपूर्वीच स्वतः भूषण कुमार आणि युवराजने याची घोषणा केली होती. मात्र यात युवराजची भूमिका कोणता अभिनेता करणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.