नवी दिल्ली : टीम इंडियाचे माजी खेळाडू मनोज प्रभाकर यांची पत्नी आणि ९० च्या दशकात आपल्या अभिनयाने अनेकांचं मन जिंकणाऱ्या अभिनेत्री फरहीन प्रभाकर यांना दिल्लीतील साकेतमध्ये एका मॉलमध्ये लुटण्यात आलं. शनिवारी सकाळी ११ वाजता ही घटना घडली. जेव्हा त्या आपल्या गाडीमध्ये बसल्या होत्या. तेव्हा काही गुंडानी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. जाब विचारण्यासाठी जेव्हा त्या गाडीबाहेर आल्या तेव्हा एका युवकाने त्यांच्या जवळची पर्स आणि मोबाईल हिसकावून पसार झाला. पोलिसांकडून प्रकरणाची चौकशी सुरु आहे.
पोलिसांनी म्हटलं की, त्यांच्या हाती काही पुरावे लागले आहेत. ज्याच्या मदतीने लवकरच या गुंडाना पकडलं जाईल. पोलीस सीसीटीव्ही रेकॉर्डिंगच्या मदतीने या गुंडाना पकडण्याचा प्रयत्न करत आहे. फरहीन प्रभाकर शनिवारी सकाळी ११ च्या दरम्याने सिटी मॉलमध्ये जात होत्या. मॅक्स रुग्णालयाजवळ काही गुंडानी अचानक त्यांच्या गाडीवर हल्ला केला. एका गुंडाने त्यांच्या डोक्यावर मुक्का मारला आणि त्यांच्या हातातील बॅग आणि मोबाईल हिसकावून तेथून फरार झाला. फरहीन या देखील त्यांच्या मागे धावल्या. पण त्यांना अस्थमाचा त्रास असल्याने ते रस्त्यातच कोसळल्या.
बॅगमध्ये जवळपास १५ हजार रुपये होते आणि काही दागिने देखील होते. फरहीन यांनी रस्त्यात एका व्यक्तीचा फोन घेऊन पोलिसांना य़ाची सूचना दिली. हे चारही आरोपी ठक-ठक गँगचे असल्याचं बोललं जातं आहे. फरहीन यांचं म्हणणं आहे की, अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे त्या खूप घाबरल्या. त्यांना सुरुवातीला काहीच कळालं नाही की त्यांच्यासोबत काय घडलं. फरहीन यांनी अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलं आहे.