केएल राहुलला टीम इंडियात घेण्यास 'या' माजी खेळाडूचा तीव्र विरोध, म्हणाला, आधी देशांतर्गत क्रिकेट खेळ...

Team India: टीम इंडियाचा खेळाडू केएल राहुल टीम इंडिया परतण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागणार आहेत, असेच दिसून येत आहे. आता तर टीम इंडियाच्या एका माजी खेळाडूने केएल राहुल याला संघात घेण्यास तीव्र विरोध केला आहे. त्यामुळेराहुलचे पुनरागमन होणार की नाही याचे सस्पेन कायम आहे.

सुरेंद्र गांगण | Updated: Jun 30, 2023, 03:08 PM IST
केएल राहुलला टीम इंडियात घेण्यास 'या' माजी खेळाडूचा तीव्र विरोध, म्हणाला, आधी देशांतर्गत क्रिकेट खेळ... title=

Team India: टीम इंडिया खेळाडू केएल राहुल टीम इंडियात परतण्याच्या तयारीत आहे. मात्र, त्याला अजून स्वत:ला सिद्ध करायचे आहे. त्याआधीच टीम इंडियाच्या एका माजी खेळाडूने केएल राहुल याला टीम इंडियात घेण्यास तीव्र विरोध केला आहे. त्यामुळेराहुलचे पुनरागमन होणार की नाही याचे सस्पेन कायम आहे.राहुलच्या पुनरागमनाच्या वृत्तावर प्रतिक्रिया देताना, भारताचा माजी फिरकी गोलंदाज लक्ष्मण शिवरामकृष्णन याने विरोध केला आहे. राहुल याने आधी प्रथम देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळून स्वतःला सिद्ध केले पाहिजे. त्यानंतर तो टीम इंडियात पुनरागमन करु शकतो.

टीम इंडियाला यावर्षी आशिया चषक आणि वर्ल्ड कप यासह काही मोठ्या स्पर्धा खेळायच्या आहेत. याआधी संघातील काही स्टार खेळाडू दुखापतीशी जायबंदी आहेत. यामध्ये ऋषभ पंत व्यतिरिक्त केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. ऋषभ पंत गेल्यावर्षी रस्ता अपघातात गंभीर जखमी झाला. तो अजून या अपघातातून सावरलेला नाही. तर केएल राहुल मांडीच्या आणि पाठीच्या समस्यांमुळे संघाबाहेर आहे. आयपीएलमधील एका सामन्यादरम्यान राहुलला दुखापत झाली आणि त्यामुळे तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम फेरीला मुकला.

राहुल सध्या बंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पुनरागमन करत आहे आणि काही आठवड्यांत फलंदाजीचा सराव सुरु करण्यास तो सज्ज आहे. राहुल आणि बुमराह सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेतून पुनरागमन करु शकतात, असे एक वृत्त आहे. राहुलच्या पुनरागमनाच्या वृत्तांवर प्रतिक्रिया देताना, भारताचा माजी फिरकी गोलंदाज लक्ष्मण शिवरामकृष्णन याने म्हटले आहे की, पाहुल याने प्रथम देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळून स्वतःला सिद्ध केले पाहिजे.

एका ट्विटला उत्तर देताना शिवरामकृष्णन याने म्हटलेय, त्याने सामन्यातील फिटनेस आणि फलंदाजीच्या फॉर्मचे मूल्यांकन करण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळले पाहिजे. भारतीय संघात पुनरागमन करणे इतके सोपे नाही. तुम्ही नेटमध्ये फलंदाजी करा आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्यासाठी सज्ज व्हा. समालोचक शिवरामकृष्णन यांनीही संघ व्यवस्थापनाला साई सुदर्शनसारख्या एखाद्यावर लक्ष ठेवून त्याला संधी देण्याची विनंती केली. IPL 2023 मध्ये साई सुदर्शनने चमकदार कामगिरी केली होती. 

दुसऱ्या एका  ट्विटमध्ये म्हटले आहे की, "डाव्या हाताचा मधल्या फळीतील फलंदाज साई सुदर्शन सारख्या खेळाडूवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. याआधी केएल राहुलने लंडनमधील शस्त्रक्रियेनंतर ट्विट करुन त्याच्या पुनरागमनाची माहिती चाहत्यांना दिली होती. या पोस्टमध्ये म्हटलेय, माझी शस्त्रक्रिया यशस्वी झाली. मी आता बरा होण्याच्या मार्गावर आहे. मी सर्वोत्तम कामगिरी करुन मैदानात उतरण्याचा निर्धार केला आहे. राहुलने पंतसोबतचा चिन्नास्वामी स्टेडियमचा फोटोही शेअर केला आहे.