MS Dhoni: 'धोनीच एकटाच खेळत होता, बाकीचे...'; हरभजनचा पुणेरी टोमणा!

Harbhajan Singh: धोनीने एकट्याने विश्वचषक ट्रॉफी जिंकल्या, असं म्हणत हरभजनने (Harbhajan singh) धोनीच्या चाहत्यांना पुणेरी भाषेत टोमणा मारला आहे.

Updated: Jun 12, 2023, 05:11 PM IST
MS Dhoni: 'धोनीच एकटाच खेळत होता, बाकीचे...';  हरभजनचा पुणेरी टोमणा! title=
arbhajan singh taunted ms dhoni

Harbhajan Singh on MS Dhoni: भारतात व्यक्तीपुजेला फार महत्त्व दिलं जातं. एखादा खेळाडू मनासारखा खेळला आणि सामना जिंकला तर खेळाडूला डोक्यावर चढवलं जातं. तर, एखाद्या खेळाडूने खराब कामगिरी केली आणि सामना हारला तर त्याच्या नावाचे खडे फोडले जातात. प्रेक्षकांकडून केली जाणारी अपेक्षा खेळाडूला नेहमी दडपणखाली ठेवतं. त्यामुळे महत्त्वाच्या सामन्यात त्याचा परिणाम दिसून येतो. अशातच आता टीम इंडियाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंह (Harbhajan singh) याने देखील खडे बोल सुनावले आहेत.

काय म्हणाला हरभजन सिंह?

ना कोणी कोच, ना कोणता मेंटॉर, बहुतेक ज्येष्ठ खेळाडूंनी भाग घेण्यास नकार दिला. यापूर्वी कधीही एकाही टी-ट्वेंटी सामन्याचं नेतृत्व केलं नाही. या व्यक्तीने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आणि कर्णधार झाल्यानंतर 48 दिवसांत T20 विश्वचषक जिंकून दाखवला, असं धोनीच्या चाहत्याने लिहिलं होतं. त्यावर हरभजन सिंह याने खडेबोल सुनावले आहेत. 

होय, जेव्हा सामने खेळवले जात होते, तेव्हा हा तरूण खेळाडू (MS Dhoni) टीम इंडियासाठी एकटा खेळत होता. बाकीचे 10 खेळाडू खेळत नव्हते. त्यामुळे त्याने एकट्याने विश्वचषक ट्रॉफी जिंकल्या, असं म्हणत हरभजनने धोनीच्या चाहत्यांना पुणेरी भाषेत टोमणा मारला आहे.

जेव्हा ऑस्ट्रेलिया (Australia) किंवा इतर कोणत्याही देशाने विश्वचषक जिंकला तेव्हा ऑस्ट्रेलिया किंवा इतर देश जिंकले, असं म्हणता. मात्र, जेव्हा भारतीय जिंकतो तेव्हा कर्णधार जिंकला असे म्हणतात, असं म्हणत हरभजनने खडे बोल सुनावले आहेत. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. एकत्र जिंका किंवा एकत्र पराभूत व्हा, असंही हरभजन (Harbhajan singh On MS Dhoni Fans) म्हणाला आहे.

 

आणखी वाचा - Sachin Tendulkar: "मला समजलंच नाही, इतकी मोठी चूक...", मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरची सडकून टीका!

दरम्यान, मोठ्या सामन्यातील पराभवाची खापर फोडण्यासाठी कोणत्या ना कोणत्या खेळाडूला टार्गेट केल्याचं दिसतं. 2014 साली झालेल्या टी-ट्वेंटी सामन्याचं खापर युवराज सिंहवर फोडण्यात आलं होतं, तर याच फायनल सामन्यात धोनीने देखील निराशाजनक कामगिरी केली होती. 2015 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये काही खेळाडूंनी फक्त धोनीला दोषी ठरवलं होतं. त्यामुळे हरभजन सिंह याने योग्यरित्या टीकाकारांना सुनावलं आहे.