आगामी टी20 सामन्यांतून धोनीला वगळलं

पाहा कोणत्या खेळाडूला मिळालं संघात स्थान

ANI | Updated: Oct 27, 2018, 08:35 AM IST
आगामी टी20 सामन्यांतून धोनीला वगळलं title=

मुंबई : वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघाविरोधात भारतीय क्रिकेट संघांच्या आगामी टी20 सामन्यांसाठी आणि मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. निवड समितीकडून घेण्यात आलेल्या निर्णयानुसार भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला संघातून वगळण्यात आलं आहे. 

गेल्या बऱ्याच काळापासून धोनीचा एकंदर फॉर्म पाहता निवड समिती या निर्णयावर पोहोचल्याचं कळत आहे. 

इंग्लंड दौऱ्यापासून सध्या सुरु असणाऱ्या सामन्यांमध्येही धोनीला प्रभावी खेळाचं प्रदर्शन करताच आलेलं  नाही. परिणामी त्याची संघात निवड न करण्यात आल्यामुळे हा त्याच्यासाठी धक्काच असण्याचं कळत आहे. 

वेस्ट इंडियविरोधातील टी20 सामन्यासाठीचा संघ

वेस्ट इंडिडविरोधात खेळल्या जाणाऱ्या टी20 मालिकेसाठी कर्णधारपदी असणाऱ्या विराट कोहलीला आराम देण्यात आला असून, धोनीला संघातूनच वगळण्यात आलं आहे. 

विराटच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा संघाचं नेतृत्व करेल. तर ऋषभ पंत यष्टीरक्षण करणार आहे. फिरकी गोलंदाज शाहबाज नदीम यालाही संघात स्थान मिळालं आहे.

ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिकेसाठी भारतीय संघ 

ऑस्ट्रेलिया विरोधातील मालिकेसाठीच्या संघातहीव धोनीला स्थान मिळाले नाही. तर मालिकेत विराटकडे पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. 

याशिवाय वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, खलील या खेळाडूंची कामगिरी क्रीडारसिकांना पाहता येणार आहे. 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेसाठीसुद्धा भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. 

कसोटी संघामध्ये मुरली विजयचं पुनरागमन झालं असून रोहित शर्मा आणि भुवनेश्वर कुमार यांना संघात स्थान देण्यात आलं आहे, तर हार्दिक पांड्याला संघातून वगळण्यात आलं आहे.