फायनल मॅच फिक्स होती, कमाल खानचा आरोप

महिला क्रिकेट वर्ल्डकपच्या फायनलमध्ये जरी भारतीय संघाचा इंग्लंडकडून पराभव झाला असला तरी क्रिकेट चाहत्यांची मने मात्र त्यांनी जिंकलीत. 

Updated: Jul 25, 2017, 03:40 PM IST
फायनल मॅच फिक्स होती, कमाल खानचा आरोप title=

नवी दिल्ली : महिला क्रिकेट वर्ल्डकपच्या फायनलमध्ये जरी भारतीय संघाचा इंग्लंडकडून पराभव झाला असला तरी क्रिकेट चाहत्यांची मने मात्र त्यांनी जिंकलीत. 

वर्ल्डकपच्या फायनलपर्यंत मजल मारणाऱ्या टीम इंडियाचे कौतुक सर्वत्र केले जातेय. याचदरम्यान अभिनेता कमाल खानने टीम इंडिया आणि मिताली राजवर गंभीर आरोप केलेत.

ट्विटरवर त्याने याबाबत वादग्रस्त विधान केलेय. ज्या पद्धतीने मिताली बाद झाली त्यावरुन ही मॅच फिक्स होती, असं तो ट्विटरवर म्हणालाय.

फायनलमध्ये मॅचमध्ये १७ धावांवर खेळत असताना रनआउट झाली. या सामन्यात भारताला ९ धावांनी पराभव पत्करावा लागला.