टिश्यू पेपरवर नंबर आणि वर्ल्ड कप जिंकण्याच्या अटीवर लग्न... श्रीसंतची फिल्मी Love Story

एस श्रीसंतची क्रिकेट कारकिर्द जितकी वादग्रस्त होती, तितकीच त्याची लव्ह स्टोरीही अगदी फिल्मी आहे, वाचा

Updated: Nov 13, 2022, 04:40 PM IST
टिश्यू पेपरवर नंबर आणि वर्ल्ड कप जिंकण्याच्या अटीवर लग्न... श्रीसंतची फिल्मी Love Story title=

S Sreesanth And Bhuvneshwari Kumari Love Story: क्रिकेटचं मैदान गाजवणाऱ्या अनेक भारतीय क्रिकेटपटूंचं लग्न अगदी एखाद्या सिनेमाला साजेशी स्टोरी आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरपासून (Sachin Tendulkar) भारतीय क्रिकेटचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्र सिंग धोणीची (M S Dhoni) लव्ह स्टोरीही (Love Story) अगदी फिल्मी आहे. यात आणखी एक नाव म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज एस श्रीसंत.

श्रीसंतची क्रिकेट कारकिर्द
एस श्रीसंत (S Sreesanth) भारतासाठी 27 कसोटी, 53 एकदिवसीय आणि 10 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. 2005 मध्ये श्रीसंतने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (Internation Debut) पदापर्ण केलं. वेग आणि आक्रमक शैलीमुळे अल्पावधीतच श्रीसंत भारतीय क्रिकेटमध्ये लोकप्रिय झाला. 2007 च्या पहिल्या टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2007) विजेत्या संघात एस श्रीसंतने मोलाची भूमिका बजावली. पण श्रीसंतची क्रिकेट कारकिर्द दिर्घकाळ टिकू शकली नाही. 2013 मध्ये श्रीसंतवर स्पॉट फिक्सिंगचा (Spot Fixing) आरोप झाला आणि यात त्याला अटक करण्यात आली. यानंतर श्रीसंतची क्रिकेट कारकिर्द जवळपास संपुष्टात आली. 

श्रीसंतची लव्ह स्टोरी
श्रीसंतची क्रिकेट कारकिर्द जितकी चर्चित होती तितकीच त्याची लव्हस्टोरीही मजेशीर आहे. श्रीसंसच्या पत्नीचं नाव भुवनेश्वरी कुमारी (Bhuvneshwari Kumari). या दोघांची पहिली ओळख एका शाळेत झाली. या शाळेत श्रीसंत प्रमुख पाहुणा (Special Geust) म्हणून उपस्थित होता. श्रीसंत जेव्हा प्रमुख पाहुणा म्हणून जेव्हा शाळेत आला तेव्हा शाळेतील मुली त्याला बघून वेड्या झाल्या. प्रत्येक मुलीला त्याची भेट घ्यायची होती. भुवनेश्वरीने सांगितलं सर्व मुलींना श्रीसंतला भेटावसं वाटत असलं तरी मला त्यावेळी तसंच काहीच वाटलं नाही. पण दुसऱ्याच दिवशी तो शाळेच्या स्पोर्टस कार्यक्रमातही श्रीसंत उपस्थित होता आणि इथेच त्याची आणि भुवनेश्वरीची नजरानजर झाली. पहिल्याच नजरेत दोघांना एकमेकांविषयी प्रेम झालं आणि त्यानंतर एकदोनवेळा भेटही झाली.

पण खरी प्रेम कहाणी सुरु झाली ती एका हॉटेलमध्ये, श्रीसंत आणि भुवनेश्वरी डिनरसाठी एक हॉटेलमध्ये भेटले. श्रीसंतने भुवनेश्वरीकडे तिचा मोबाईलनंबर मागितला. पण भुवनेश्वरीने त्यास नकार दिला. शेवटी श्रीसंतने हॉटेलमधल्या एका टिश्यू पेपरवर स्वत:चा मोबाईल नंबर लिहिला आणि तिला दिला. मी जेव्हा चांगला खेळेन तेव्हा तु मला शुभेच्छा देण्यासाठी फोन करु शकतेस असं मेसेजही श्रीसंतने भुवनेश्वरीला दिला.

श्रीसंतचा नंबर वाटला खोटा
श्रीसंतने दिलेल्या मोबाईल नंबरमध्ये अनेक शुन्य होते, त्यामुळे सुरुवातीला श्रीसंतने दिलेला नंबर भुवनेश्वरीला खोटा वाटला. पण जेव्हा तीने फोन केला तेव्हा श्रीसंतनेच उचचला. यानंतर दोघांमध्ये बोलणं वाढलं. श्रीसंत तिला शायरी ऐकवतं असे. हळु-हळु भुवनेश्वरीलाही श्रीसंत आवडू लागला. 

वर्ल्ड कप जिंकल्यावरच लग्न
भेटी गाठी वाढत गेल्या आणि दोघांची मनं जुळली. 2009 ला श्रीसंतने भुवनेश्वरी सांगितलं, 2011 मध्ये जर भारतीय संघ वर्ल्ड कप जिंकला तरी मी तुझा हात मागण्यासाठी तुझ्या घरी येईन. 2011 भारतीय संघ वर्ल्ड कप जिंकला आणि श्रीसंतने भुवनेश्वरीच्या कुटुंबियांकडे भुवनेश्वरीबरोबर लग्नाचा प्रस्ताव मांडला. पण यानंतर श्रीसंत स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकला आणि लग्न तब्बल दोन वर्ष लांबलं. 

भुवनेश्वरी श्रीसंतपेक्षा 9 वर्षांनी लहान
एका मुलाखतीत श्रीसंतने आपल्या त्या दोन वर्षांच्या कटू अनुभवाविषयी सांगितलं होतं. स्पॉट फिक्सिंगचा आरोप झाल्यानंतर मनात टोकाचा निर्णय घेण्याचाही विचार आला होता. पण एके दिवशी भुवनेश्वरीचे वडिल भेटायला आले. त्यांनी भुवनेश्वरी अजूनही तुझ्यावर प्रेम करते आणि तिला तुझ्याशी लग्न करायचं आहे असं सांगितलं. भुवनेश्वरी जयपूरमधल्या एका मोठ्या राजघराण्याशी जोडली गेलली आहे. श्रीसंतच्या कठिण काळात भुवनेश्वरी त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिली. 12 डिसेंबर 2013  मध्ये शाही थाटात श्रीसंत आणि भुवनेश्वरीचं लग्न झालं. भारतातले अनेक दिग्गज या लग्नात सहभागी झाले होते. श्रीसंत आणि भुवेश्वरीला दोन मुलं आहे. नुकताच श्रीसंतवर लावण्यात आलेला बॅनही संपला आहे. (S Sreesanth Love Story)