FIFA WC 2022: मिस्ट्री गर्ल Ivana Knoll हीनं सांगितलं उपांत्य फेरीत कोण जिंकणार? Video Viral

FIFA World Cup 2022 स्पर्धेचा थरार आता अंतिम टप्प्यात आहे. उपांत्य फेरीत अर्जेंटिना विरुद्ध क्रोएशिया आणि फ्रान्स विरुद्ध मोरोक्को यांच्यात सामना रंगणार आहे. पहिला सामना अर्जेंटिना आणि क्रोएशियात यांच्यात असून मिस्ट्री गर्ल Ivana Knoll च्या भाकीतानं खळबळ उडाली आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून Ivana Knoll चर्चेत आहे.

Updated: Dec 13, 2022, 06:04 PM IST
FIFA WC 2022: मिस्ट्री गर्ल Ivana Knoll हीनं सांगितलं उपांत्य फेरीत कोण जिंकणार? Video Viral title=

FIFA World Cup 2022 Argentina Vs Croatia: फीफा वर्ल्डकप स्पर्धेचा थरार आता अंतिम टप्प्यात आहे. उपांत्य फेरीत अर्जेंटिना विरुद्ध क्रोएशिया आणि फ्रान्स विरुद्ध मोरोक्को यांच्यात सामना रंगणार आहे. पहिला सामना अर्जेंटिना आणि क्रोएशियात यांच्यात असून मिस्ट्री गर्ल Ivana Knoll च्या भाकीतानं खळबळ उडाली आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून Ivana Knoll चर्चेत आहे. कतारमध्ये छोटे कपडे घालून स्टेडियममध्ये जाण्यास मनाई आहे. असं असताना Ivana Knoll नियमांचं उल्लंघन करून मैदानात जात आहे. तसेच स्टेडियमबाहेर चाहत्याशी संपर्क साधत आहे. याबाबतचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. क्रोएशिया आणि अर्जेंटिना या दोन संघात कोण बाजी मारणार याबाबत Ivana Knoll हीने आपल्या अंदाजात उत्तर दिलं आहे. यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

Ivana Knoll हीच्या समोर क्रोएशिया आणि अर्जेंटिना संघांचं टीशर्ट घालून दोन चाहते उभे होते. तेव्हा तिने फुटबॉल मारला आणि तो क्रोएशियाचं टीशर्ट घातलेल्या व्यक्तीला लागला. Ivana Knoll हीच्या अंदाजानुसार उपांत्य फेरीचा सामना क्रोएशिया जिंकेल. स्पर्धेदरम्यान Ivana Knoll ही क्रोएशियाई झेंडाचा प्रतिकात्मक ड्रेस घालून फिरत होती. तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. Ivana Knoll इन्स्टाग्रामवर 25 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

बातमी वाचा- Fifa WC 2022 Semi Final: "मेस्सीचा अर्जेंटिना संघ तर..." क्रोएशियाच्या प्रशिक्षकांनी असं सांगताच अर्जेंटिनानं दिलं उत्तर

क्रोएशिया संघाकडे डार्क हॉर्स म्हणून पाहिलं जातं. फीफा वर्ल्डकप 2018 स्पर्धेतही क्रोएशियाने उपांत्य फेरीत इंग्लंडला 2-1 ने पराभूत करत अंतिम फेरी गाठली होती. मात्र अंतिम फेरीत फ्रान्सनं क्रोएशियाचा 4-2 ने पराभव करत विश्व चषकावर नाव कोरलं होतं. यंदाच्या विश्वचषकातही क्रोएशियाची कामगिरी उत्तम राहिली आहे. स्पर्धेत दिग्गज संघांना घराचा रस्ता दाखवल्यानंतर वर्ल्डकप इतिहासात दुसऱ्यांदा उपांत्य फेरी गाठली आहे. यावेळी मेस्सीचा अर्जेंटिना संघ समोर आहे. त्या पार्श्वभूमीवर क्रोएशियाने आपली रणनिती आखली आहे. क्रोएशियाचा प्रशिक्षक झ्लात्को डालिक यांनी अर्जेंटिना विरुद्ध खास व्यूहरचना आखली आहे.