FIFA World Cup 2022 : सध्या कतारमध्ये फीफा वर्ल्ड कप 2022 (FIFA World Cup 2022) खेळवला जातोय. वर्ल्डकपदरम्यान चोरी आणि लूट यांसारखे प्रकार घडल्याने हा सीझन वादामध्ये सापडलाय. तर आता दुसरीकडे अजून एक मोठी घटना समोर आली आहे. फुटबॉल स्टार लिओनेल मेस्सीची (Lionel Messi) टीम अर्जेंटीना आणि मक्सिको (Argentina vs Mexico) यांच्यात सामना रंगणार आहे. दरम्यान याचपूर्वी स्टेडियमजवळ आग (Massive fire) लागल्याची मोठी बातमी हाती आलीये.
फीफा वर्ल्ड कप 2022 च्या लुसॅल शहरात असलेल्या स्डेडियमजवळ (Lusail Stadium) एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली. ही घटना स्टेडियम आणि फॅन विलेजच्या अगदी जवळ घडलीये. वर्ल्डकपचा थरार अनुभवण्यासाठी फुटबॉल चाहते याठिकामी थांबले आहेत. मात्र यावेळी सुदैवाने फुटबॉल चाहत्यांना किंवा स्टेडियमचं नुकसान झालेलं नाही.
कतारच्या ऑथोरीटीनेही आग लागल्याची ही घटना घडल्याची पुष्टी केली आहे. 26 नोव्हेंबरची ही घटना असल्याचं सांगण्यात येतंय. मिळालेल्या माहितीनुसार, लुसॅल स्टेडियमपासून जवळपास 3.5 किमी दूर ही दुर्घटना घडली आहे. याठिकाणी एका इमारतीचं बांधकाम सुरु होतं आणि त्याचवेळी हे अग्नितांडव घडलं.
A fire has broken out in #Qatar near the #FIFAWorldCup fan zone site in the city of #Lusail.
More details awaited. pic.twitter.com/lQ8nWZRDHQ
— Saikiran Kannan | (@saikirankannan) November 26, 2022
कतारच्या इंटीरियर मिनिस्ट्रीच्या म्हणण्याप्रमाणे, ही आग स्थानिक वेळेनुसार, दुपारी 2 ला लागली होती. या इमारतीचं बांधकाम सुरु होतं आणि या इमारतीला आग लागली. वर्ल्डकपच्या दरम्यान अनेक सामने या स्टेडियममध्ये खेळवले जात आहेत.
मोठी गोष्ट म्हणजे, लिओनेल मेस्सी कर्णधार असलेल्या अर्जेंटीना टीमचा आजचा याच स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. काही तासांमध्येच हा सामना सुरु होणार आहे. अर्जेंटीना टीमसाठी हा सामना 'करो या मरो'च्या स्थितीत असणार आहे. हा अर्जेंटीनाचा दुसरा सामना आहे. अर्जेंटीनाचा पहिला सामना सौदी अरेबियासोबत खेळला गेला असून या सामन्यात त्यांचा 1-2 ने पराभव झाला.