FIFA World Cup 2022: 'हा' संघ फुटबॉल वर्ल्ड कप जिंकणार? मॉडर्न नॉस्ट्राडेमसची भविष्यवाणी

FIFA World Cup 2022 : 36 वर्षीय एथोस सालोमने फिफा विश्वचषक 2022 बाबत मोठे भाकित केले असून FIFA विश्वचषक 2022 चा अंतिम सामना कोणत्या दोन संघांमध्ये खेळला जाईल, असा मोठा अंदाज एथोस सलोमने वर्तवला आहे. तसेच ब्राझीलच्या या तरुणाचे नाव एथोस सैलोमे आहे. एथोसचा दावा आहे की त्याने कोरोना महामारी, राणी एलिझाबेथचा मृत्यू, एलम मस्क ट्विटर खरेदीचा प्रयत्न आदींबाबत भविष्यवाणी केली होती.       

Updated: Nov 24, 2022, 01:30 PM IST
FIFA World Cup 2022: 'हा' संघ फुटबॉल वर्ल्ड कप जिंकणार? मॉडर्न नॉस्ट्राडेमसची भविष्यवाणी    title=

FIFA World Cup 2022 Final Match Prediction  : सर्वांना नॉस्ट्रॅडॅमस माहितीच असेल, जगविख्यात भविष्यवेत्ता. या भविष्यवेत्त्याने शेकडो वर्षांपूर्वी अनेक गोष्टी सांगून ठेवल्या आहेत. ज्या त्या त्या वेळेनुसार खऱ्या ठरत असल्याचा दावा केला जात आहे. असाच एक आधुनिक जगतातील भविष्यवेत्ता सापडला आहे. त्याला या काळातला नॉस्ट्रॅडॅमस म्हटले जातेय. ब्राझीलच्या या तरुणाचे नाव एथोस सैलोमे आहे. एथोसचा दावा आहे की त्याने कोरोना महामारी, राणी एलिझाबेथचा मृत्यू, एलम मस्क ट्विटर खरेदीचा प्रयत्न आदींबाबत भविष्यवाणी केली होती. त्यानंतर आता फिफा विश्वचषक 2022 बाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. एथोस सैलोमे यांच्या भविष्यवाणीमुळे फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 

फिफा विश्वचषक स्पर्धेला (Fifa World Cup) थाटामाटात सुरुवात झाली असून अगदी रंगतदार सामने पाहायला मिळत आहेत. अशातच  FIFA विश्वचषक 2022 चा अंतिम सामना लिओनेल मेस्सीचा अर्जेंटिना आणि किलियन एमबाप्पेचा संघ फ्रान्स यांच्यात खेळला जाईल, असा अंदाज एथोस सलोमेने वर्तवला आहे. फ्रान्स हा फिफा विश्वचषकाचा गतविजेता संघ आहे. 4 वर्षांपूर्वी रशियात खेळल्या गेलेल्या फिफा विश्वचषक 2018 मध्ये फ्रान्सने विजेतेपद पटकावले होते. यावेळी कतार फिफा विश्वचषक 2022 मध्ये जेतेपद वाचवण्याची जबाबदारी फ्रान्सची आहे. 

वाचा: भारत-न्यूझीलंड एकदिवसीय सामन्याआधीच मोठी बातमी, पाहा वेळापत्रक 

थॉस सलोमने भाकीत केले आहे की जर अर्जेंटिनाला अंतिम फेरी गाठायची असेल तर त्यांना पुढील सर्व सामने जिंकावे लागतील. मात्र, सौदी अरेबियाविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात अर्जेंटिनाला 2-1 ने पराभव स्वीकारावा लागला होता. एथोस सलोमने आपल्या भविष्यवाणीत FIFA विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीत खेळण्यासाठी 5 संघांना दावेदार म्हणून नाव दिले आहे. एथोस सालोमे यांनी FIFA विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीसाठी फ्रान्स, बेल्जियम, अर्जेंटिना, ब्राझील आणि इंग्लंडचे दावेदार म्हणून नाव दिले आहे.

त्याच्या अंदाजाने खळबळ माजवली

एथोस सैलोमेचे अनेक अंदाज नुकतेच खरे ठरले आहेत. जसे की कोरोना महामारी, रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आणि ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन इ. आणि आता एथोस सलोमने कतारमध्ये सुरू असलेल्या FIFA विश्वचषक 2022 संदर्भात आपल्या भविष्यवाणीने खळबळ उडवून दिली आहे.