मुंबई : आयपीएलच्या 15 व्या सिझनमध्ये क्वालिफायर 2 सामन्यात राजस्थान रॉयल्सने आरसीबीवर 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवलाय. या विजयासह राजस्थानने अंतिम सामन्यात धडक मारली आहे. तर आरसीबीचं आयपीएल जिंकण्याचं स्वप्न पुन्हा एकदा अधुरं राहिलंय. दरम्यान फायलनमध्ये धडक न मारता आल्याने आरसीबी कर्णधार फाफ-ड्यु प्सेसिस इमोशनल झाल्याचं दिसून येतंय.
कालचा सामना संपल्यानंतर फाफ म्हणाला, आरसीबीसाठी हा सिझन चांगला होता. मला खरंच खूप अभिमान आहे. भारतातील लोकांबद्दल आम्हाला खूप आदर आहे. हा भारतीय संस्कृतीचा एक चांगला भाग आहे. स्टेडियममध्ये होणाऱ्या आरसीबी आरसीबीच्या जयघोषाने मी मंत्रमुग्ध झालो तर खेळाडी भावूक झाले.
फाफ पुढे म्हणाला, भारतात क्रिकेटपटू म्हणून तुम्हाला मिळणारा पाठिंबा उल्लेखनीय आहे. सर्वांनी छान खेळा केला, खूप खूप धन्यवाद.
भारतीय क्रिकेटला उत्तम भविष्य आहे, आयपीएल नंतर तुम्ही नेहमीच तीन भारतीय संघ निवडू शकता, ज्यात तरुण खेळाडूंचा समावेश आहे. जेव्हा मी फ्रेंचायझीमध्ये सामील झालो तेव्हा ही सर्वात स्पष्ट गोष्ट होती, असंही फाफने सांगितलंय.