मुंबई : एकीकडे आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरल्याने गुजरात टायटन्स संघाची चर्चा सुरु आहे, तर दुसरीकडे आयपीएल फायनल सामना फिक्स होता अशीही चर्चा रंगलीय. इतकं सर्व सुरु असताना आता गुजरातचा मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा याचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोची आणि मॅच फिक्सिंगची खुप चर्चा रंगलीय.
गुजरातने निव्वळ आयपीएल ट्रॉफीवर नावच कोरले नाही तर आणखीण एक खास रेकॉर्ड केला आहे. गुजरातचा मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा आयपीएल ट्रॉफी जिंकून देणारा एकमेव भारतीय प्रशिक्षक ठरलाय. या त्याच्या कामगिरीनंतर आता आशिष नेहरावर कौतूकांचा वर्षाव होतोय. ट्विटर त्याचे फोटो पोस्ट करून क्रिकेटप्रेमी त्याचे अभिनंदन करत आहेत.
A paper, a pen and a Nehra Ji won over MacBook, data, analysis, statistics, java, h++, Artificial Intelligence etc at the end.#IPL2022 pic.twitter.com/VrQv5NawoU
— Neelabh (@CricNeelabh) May 29, 2022
साधेपणाच का होतेय कौतुक ?
सोशल मीडियावर मैदानावर असताना आशिष नेहराच्या साधेपणाचं कौतूक केले जातेय. तंत्रज्ञानाच्या युगात नेहाराच्या पेन -पेपरने सामना जिंकवला,असे एका युझरने लिहत त्यांचे कौतूक केले आहे. एक पान आणि एक पेनद्वारे नेहराने मॅकबुक, डेटा अॅनालिस्ट, स्टॅटिस्टिक्स, जावा, एच प्लस प्लस, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या सर्वांना मागे सोडत विजय मिळवला. अशा अनेक भन्नाट कमेंट करून क्रिकेटप्रेमी नेहराला शुभेच्छा देतायत.