या २२ वर्षीय क्रिकेटपटूनं पकडला जबरदस्त कॅच

कॅरेबियन प्रिमिअर लीगमध्ये सेंट किट्स अॅण्ड नेविस पेट्रीयट्सनं जबरदस्त बॉलिंग आणि फिल्डिंग करत गयाना अमेझॉनचा ४ रन्सनं पराभव केला.

Updated: Aug 9, 2017, 07:09 PM IST
या २२ वर्षीय क्रिकेटपटूनं पकडला जबरदस्त कॅच  title=

मुंबई : कॅरेबियन प्रिमिअर लीगमध्ये सेंट किट्स अॅण्ड नेविस पेट्रीयट्सनं जबरदस्त बॉलिंग आणि फिल्डिंग करत गयाना अमेझॉनचा ४ रन्सनं पराभव केला. टॉस हरल्यानंतर पहिले बॅटिंग करणाऱ्या सेंट् किट्सनं २० ओव्हरमध्ये १३२ रन्स बनवले.

या मॅचमध्ये गयाना विजय होईल असं वाटत असतानाच एका जबरदस्त कॅचनं पूर्ण मॅचचं रुप बदलून गेलं. १३३ रन्सचा पाठलाग करताना गयानाचा स्कोअर १७ ओव्हरमध्ये तीन विकेटच्या मोबदल्यात १०२ रन्स होता. गयानाला २४ बॉलमध्ये जिंकण्यासाठी ३१ रन्सची आवश्यकता होती.

१७ व्या ओव्हरमध्ये हसन अलीच्या पहिल्या बॉलवर जेसन मोहम्मद बॅटिंग करत होता. पण मोठा फटका मारण्याच्या नादात फॅबियन ऍलननं बाऊंड्री लाईनवर जबरदस्त कॅच पकडला. फॅबियनचा हा कॅच सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे. या मॅचमध्ये फॅबियन खेळत नव्हता पण सबस्टिट्यूट असूनही त्यानं एका कॅचमुळे संपूर्ण मॅचच फिरवून टाकली. फॅबियनच्या या कॅचनंतर गयानाची पूर्ण टीम फक्त २७ रन्स बनवू शकली.

पाहा फॅबियनचा जबरदस्त कॅच