Arjun Tendulkar : सचिनच्या लेकाबाबत Mumbai Indians ने घेतला महत्त्वाचा निर्णय!

Mumbai Indians Retained Players : गुजरातविरुद्ध अर्जुन तेंडूलकरने (Arjun Tendulkar) अखेरचा सामना खेळला होता. आता त्याला यंदाच्या हंगामात संधी मिळेल का? असा सवाल विचारला जातोय.

सौरभ तळेकर | Updated: Nov 26, 2023, 10:17 PM IST
Arjun Tendulkar : सचिनच्या लेकाबाबत Mumbai Indians ने घेतला महत्त्वाचा निर्णय! title=
ipl 2024, Arjun Tendulkar, mumbai indians

Mumbai Indians retained Arjun Tendulkar : आयपीएल 2024 च्या लिलावापूर्वी (IPL 2024 Auction) सर्व संघांनी रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे (BCCI) सोपवली आहे. 10 संघांनी तब्बल 89 खेळाडूंना सोडचिठ्ठी देत आयपीएलच्या लिलावात रंगत आणली आहे. अशातच आता मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) देखील 11 खेळाडूंना टाटा गुड बाय केला आहे. त्यात सर्वात महत्त्वाचा खेळाडू म्हणजे जॉफ्रा आर्चर (Jofra Archer).. मुंबईने यंदाच्या हंगामासाठी 17 खेळाडूंना कायम ठेवलं आहे. कोणत्या खेळाडूंना कायम ठेवायचं? याचा विचार करताना मुंबई इंडियन्सने (Arjun Tendulkar) महत्त्वाचा निर्णय घेतला. मुंबईने यंदाच्या हंगामासाठी अर्जुन तेंडूलकरला कायम ठेवलं आहे. एमआयच्या या निर्णयाचं उत्तर लपलंय, त्याच्या लिलावाच्या किंमतीवर...

मुंबईने 2021 च्या लिलावात अर्जुनला 20 लाख रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केलं होतं, परंतु दुखापतीमुळे तो आयपीएलमधून बाहेर पडला होता. त्यानंतर 2022 च्या लिलावामध्ये मुंबईने पुन्हा मुळ किंमतीवर म्हणजेच 20 लाखावर त्याला संघात घेयची तयारी दर्शवली होती. मात्र, गुजरात टायटन्सने देखील त्याला खरेदी करण्याची इच्छा प्रकट केल्याने मुंबईने त्यावर 30 लाखाची बोली लावली अन् आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं होतं. अशातच आता अर्जुन तेंडूलकरला रिटेन करण्यात आलं आहे. मुंबईकडे लिलावासाठी आता 15.25 कोटी शिल्लक आहे. त्यामुळे त्यांनी अर्जुनला कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असावा.

आयपीएलच्या मागील हंगामातील 22 वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (Mumbai Indians vs Kolkata Knight Riders) यांच्यात खेळवला गेला होता. या सामन्यातून अर्जुन तेंडूलकरने आयपीएल (Arjun Tendulkar IPL Debut) पदार्पण केलं होतं. अर्जुन तेंडूलकरने 4 सामन्यात 9.36 च्या सरासरीने 92 रन्स देत 3 विकेट्स घेतल्या आहेत. गुजरातविरुद्ध अर्जुन तेंडूलकरने अखेरचा सामना खेळला होता. आता त्याला यंदाच्या हंगामात संधी मिळेल का? असा सवाल विचारला जातोय.

MI ने कायम ठेवलेले खेळाडू

रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, कॅम ग्रीन, शाम्स मुलानी, नेहाल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पियुष चावला, आकाश मढवाल, रोमॅरिओ शेफर्ड, जॅसॉन बेरेनड्रॉफ.

करारमुक्त केलेले खेळाडू

अर्शद खान, रमनदीप सिंघ, ह्रततिक शोकीन, राघव गोयल, जोफ्रा आर्चर, ट्रिस्टन स्टब्बस, ड्युअन जनसेन.