सुधरा रे पाकड्यांनो! मॅच संपल्यावर पाकिस्तानच्या खेळाडूची अखिलाडूवृत्ती, बेनस्टोक्ससोबत...

कसोटी सामना हरल्यावर पाकिस्तानच्या खेळाडूने पाहा काय केलं?

Updated: Dec 13, 2022, 01:31 AM IST
सुधरा रे पाकड्यांनो! मॅच संपल्यावर पाकिस्तानच्या खेळाडूची अखिलाडूवृत्ती, बेनस्टोक्ससोबत...  title=

Pakistan vs England, 2nd Test : इंग्लंड आणि पाकिस्तामधील (PAK vs ENG, 2nd Test) यांच्यामधील दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये इंग्लंडने विजय मिळवला आहे. मुलतान येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानवर 26 धावांनी विजय मिळवला आहे. सामना संपल्यावर पाकिस्तानच्या खेळाडूची अखिलाडूवृत्ती सर्व जगाने पाहिली. 

पाकिस्तानता संघ लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी प्रयत्न करत होता. शेवटची विकेट बाकी असताना पाकिस्तानकडून  सलमान (Agha Salman) आणि मोहम्मद अली (Mohammad Ali)  मैदानात होते. धावफलकही दोघांनी हलतं ठेवलं होतं, त्यावेळी बेन स्टोक्सने डोकं लावलं. बॉलिंगमध्ये बदल करून रॉबिन्सकडे चेंडू सोपवला, त्यानेही पहिल्या बॉलवर मोहम्मदला कीपरकडे झेल देण्यास भाग पाडलं आणि सामना पाकिस्तानला ऑल आऊट केलं. 

इंग्लंडने अपील केल्यावर थर्ड अम्पायरकडे मदत मागितली. पाकिस्तानसह इंग्लंडचे खेळाडू निर्णयाची वाट पाहत होते. यादरम्यान बेन स्टोक्स अलीकडे हँडशेक करण्यासाठी गेला. त्यावेळी अलीने त्याला साफपणे नकार दिला. पंचांनी आऊट दिल्यावर अली माघारी गेला. मोहम्मद अलीची आणि बेन स्टोक्सचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी अलीला ट्रोल केलं आहे.

 

दुसऱ्या कसोटी सामन्यात (Pakistan vs England, 2nd Test) इंग्लंडने पहिल्या डावात 281 धावा केल्या, त्याला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानचा पहिला डाव 202 धावांवर आटोपला. यानंतर इंग्लंडने दुसऱ्या डावात 275 धावा केल्या आणि पाकिस्तानसमोर विजयासाठी 355 धावांचे लक्ष्य ठेवलं. मात्र, अखेर पाकिस्ताला अखेर 328 धावांवर समाधान मानावं लागलं. मार्क वूडने (Mark Wood) घातक गोलंदाजी करत दुसऱ्या डावात 4 गडी तंबूत पाठवले.