IND vs ENG 2nd T20: इंग्लंडने जिंकला टॉस, अशी असेल दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन

टीम इंडियात स्टार खेळाडूंची एन्ट्री 

Updated: Jul 9, 2022, 06:51 PM IST
IND vs ENG 2nd T20: इंग्लंडने जिंकला टॉस, अशी असेल दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन title=

मुंबई : टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये आज दुसरा टी20 सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याचे टॉस इंग्लंडने जिंकला आहे. इंग्लंडने फिल्डींग करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे टीम इंडियाला प्रथम फलंदाजीस उतरावे लागणार आहे. आता प्रथम फलंदाजी करून टीम इंडिया किती धावांचा डोंगर उभारतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  

भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे खेळवला जाणार आहे.या सामन्या दोन्ही संघानी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केले आहेत.  

युवा खेळाडू बाहेर

या सामन्यात भारतीय टीममध्ये मोठे बदल केले आहेत. दीपक हुड्डा आणि ईशान किशनला बाहेर बसवले आहे. तर विराट कोहली, ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह या दिग्गज खेळाडूंची संघाच वापसी करण्यात आली आहे. 

इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. टायमल मिल्स आणि रीस टोपले यांना वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी रिचर्ड ग्लीसन आणि डेव्हिड विली यांची निवड करण्यात आली. ग्लेसन पदार्पण करत आहे.

दरम्यान पहिल्या T20 मध्ये भारताने इंग्लंडचा 50 धावांनी पराभव केला. आता टीम इंडियाला दुसरा टी-२० जिंकून मालिका जिंकायची आहे. दुसरीकडे, इंग्लंडच्या नजरा आपल्या पहिला विजयावर असणार आहेत. 

टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल

इंग्लंड टीम 
जेसन रॉय, जोस बटलर (कर्णधार आणि यष्टिरक्षक), डेव्हिड मलान, लियाम लिव्हिंगस्टोन, हॅरी ब्रूक, मोईन अली, सॅम करन, डेव्हिड विली, ख्रिस जॉर्डन, रिचर्ड ग्लेसन, मॅथ्यू पार्किन्सन.