भारताविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये इंग्लंडनं टॉस जिंकला

भारताविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये इंग्लंडनं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.

Updated: Jul 17, 2018, 04:52 PM IST
भारताविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये इंग्लंडनं टॉस जिंकला title=

लीड्स : भारताविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये इंग्लंडनं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. या मॅचमध्ये भारतीय टीमनं तीन बदल केले आहेत. लोकेश राहुलऐवजी दिनेश कार्तिकला टीममध्ये संधी देण्यात आली आहे. तर सिद्धार्थ कौलऐवजी भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादवऐवजी शार्दुल ठाकूरना टीममध्ये स्थान मिळालं आहे. पहिल्या वनडेमध्ये झालेल्या विजयानंतर दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा पराभव झाला. यामुळे ३ वनडे मॅचची सीरिज आता १-१नं बरोबरीत आहे. त्यामुळे टी-२० सीरिजनंतर वनडे सीरिजही जिंकण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरेल.

भारतीय टीम

रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, दिनेश कार्तिक, सुरेश रैना, एम.एस.धोनी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल

इंग्लंडची टीम

जॉनी बेअरस्टो, जेम्स विन्स, जो रुट, इओन मॉर्गन, बेन स्टोक्स, जॉस बटलर, मोईन अली, डेव्हिड अली, लियाम प्लंकेट, अदिल रशीद, मार्क वूड 

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा