लंडन : जसप्रीत बुमराहने (Jaspreet Bumrah) इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात (Eng vs ind 1st Odi) कारनामा केला आहे. बुमराहने अवघ्या 19 धावांच्या मोबदल्यात 6 विकेट्स घेतल्या आहेत. बुमराहने यासह आपल्या नावे रेकॉर्ड केला आहे. (eng vs ind 1st odi team india yorker king jasprit bumrah take 6 wickets and bowled best spell his odi career)
बुमराहच्या एकदिवसीय कारकिर्दीतील ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. तसेच बुमराहची 5 विकेट्स घेण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे बुमराह इंग्लंडमध्ये 6 विकेट्स घेणारा पहिला भारतीय ठरला आहे.
बुमराहने जेसन रॉय, जॉनी बेयरस्टो, जो रूट, लियाम लिविंगस्टोन, डेविड विली आणि ब्रायडन कार्स या 6 जणांना माघारी पाठवलं. उल्लेखनीय बाब म्हणजे बुमराहने रॉय, रुट आणि लिविंगस्टोन या तिघांना शून्यावर आऊट केलं.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल आणि प्रसिद्ध कृष्णा.
टीम इंग्लंड : जोस बटलर (कॅप्टन), जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जो रूट, बेन स्टोक्स, लियाम लिविंगस्टोन, मोईन अली, डेविड विले, क्रेग ओव्हरटन, ब्रायडन कार्स आणि रीस टॉपले.
For his brilliant 5-wicket haul and bowling figures of 6/19, @Jaspritbumrah93 is our Top Performer from the first innings.
A look at his bowling summary here #TeamIndia #ENGvIND pic.twitter.com/jJsMuwCFKM
— BCCI (@BCCI) July 12, 2022