रोहित शर्माला देशापेक्षा EGO महत्त्वाचा? 2011 चा वर्ल्डकप का पाहणार नव्हता? स्वत:च केला खुलासा!

Rohit Sharma : 2011 नंतरच्या दोन्ही वर्ल्डकप ( ICC Cricket World Cup ) टीममध्ये रोहित शर्मा ( Rohit Sharma ) चा टीममध्ये समावेश करण्यात आला होता. मात्र या 2015 आणि 2019 साली टीम इंडियाला वर्ल्डकप जिंकणं शक्य झालं नाही. 

सुरभि जगदीश | Updated: Aug 8, 2023, 04:04 PM IST
रोहित शर्माला देशापेक्षा EGO महत्त्वाचा? 2011 चा वर्ल्डकप का पाहणार नव्हता? स्वत:च केला खुलासा! title=

Rohit Sharma : 2011 वर्षीचा वर्ल्डकप ( ICC Cricket World Cup ) कोणत्या भारतीयाच्या लक्षात नसेल? 1983 नंतर टीम इंडियाने वनडे वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं होतं. भारतीय चाहत्यांप्रमाणे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) च्या देखील हा वर्ल्ड चांगलाच लक्षात आहे. याचं कारण म्हणजे या वर्ल्डकपसाठी तो टीममध्ये जागा मिळवू शकला नव्हता. दरम्यान याचसंदर्भात रोहितने यंदाच्या वर्ल्डकपपूर्वी ( ICC Cricket World Cup ) एक आठवण शेअर केलीये. 

2011 नंतरच्या दोन्ही वर्ल्डकप ( ICC Cricket World Cup ) टीममध्ये रोहित शर्मा ( Rohit Sharma ) चा टीममध्ये समावेश करण्यात आला होता. मात्र या 2015 आणि 2019 साली टीम इंडियाला वर्ल्डकप जिंकणं शक्य झालं नाही. 

रोहितने सांगितली 2011 च्या वर्ल्डकपची आठवण

आयसीसीशी बोलताना रोहित ( Rohit Sharma ) ने मोठा खुलासा केला आहे. यावेळी त्याने, टीम इंडियाची निवड करताना निवडकर्त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याने संपूर्ण वर्ल्डकप न पाहण्याचा निर्णय घेतला असल्याचं उघड केलं.

काय म्हणाला रोहित शर्मा?

रोहित शर्मा ( Rohit Sharma ) म्हणाला की, 2011 वर्ल्डकप ( ICC Cricket World Cup ) आपल्या सर्वांसाठी एक आनंदाचा क्षण होता. मला अजूनही आठवतंय की तो वर्ल्डकप मी घरी बसून पाहिला होता. त्यावेळी टाकलेला आणि खेळलेला प्रत्येक चेंडू मला आठवतोय. त्यावेळी माझ्या मनात दोन भावना होत्या. माझा टीममध्ये समावेश केला गेला नसल्याने मी काहीसा निराश होतो. त्यामुळे मी निर्णय घेतला होता की, मी वर्ल्डकप पाहणार नाही. 

त्यावेळी मी निश्चय केला होता की, मी वर्ल्डकप ( ICC Cricket World Cup ) पाहणार नाही. मात्र दुसरी गोष्ट मला आठवतेय ती म्हणजे, भारत क्वार्टर फायनलनंतर चांगला खेळत होता. पाकिस्तानसोबत सामना असल्याने खेळाडूंवर किती दबाव होता याची मी कल्पना करू शकत होतो. तर ऑस्ट्रेलियाविरूद्ध क्वार्टर फायनलमध्ये युवराज आणि रैनाने चांगला खेळ केला होता, असंही रोहित ( Rohit Sharma ) ने सांगितलं.

रोहित ( Rohit Sharma ) च्या म्हणण्याप्रमाणे 2015 आणि 2019 च्या वनडे वर्ल्डकपचा ( ICC Cricket World Cup ) मी भाग होतो. तेव्हा वर्ल्डकप खेळताना खूप छान वाटलं. आम्ही सेमीफायनलपर्यंची मजल गाठली होती. मात्र अंतिम फेरीत पोहोचण्याचा आणि चांगला खेळ करण्याचा आमचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण आम्ही पराभूत झालो.